सिंधुदुर्ग- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, या मदतीवरून आता राजकारण तापले आहे. भाजपचे नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी या मदतीवरून सरकारवर टीका केली आहे.
ठाकरे सरकारवर टीका करताना जठार म्हणाले की, सरकारने 25 कोटींचा आवळा देऊन 200 कोटींचा कोवळा काढला. हे सरकार म्हणजे बनवाबनवी करत आहे. चांदा ते बांदा योजनेचे 100 कोटी व डीपीडीसीचे 100 कोटी, असा एकूण 200 कोटी रुपयांचा विकास निधी या सरकारने काढून घेतला आणि 25 कोटी दिले, असे हे बनवाबनवीचे सरकार आहे.