ETV Bharat / state

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आरोग्य खाते काढून घ्या;  गोव्याचे राजकारण पेटले - गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे

गेले कित्येक दिवस राज्यात कोविड बाधित मरत चालले आहेत. त्यास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा कारभार जबाबदार असल्याची जोरदार टीका पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केली आहे. तसेच राणेंचे आरोग्य खाते त्वरित काढून घ्यावे व त्यांनी आरोग्य खात्यात केलेल्या सर्व व्यवहारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आरोग्य खाते काढून घेण्यावर गोव्यात पेटले राजकारण

author img

By

Published : May 13, 2021, 12:45 PM IST

सिंधुदुर्ग - कोविडप्रश्नी अपयशी ठरलेल्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आरोग्य खाते त्वरित काढून घ्या. तसेच त्यांनी आरोग्य खात्यात केलेल्या सर्व व्यवहारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केली आहे. ते पणजी येथे बोलत होते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मडगावातील ऑक्सिजन गळती प्रकरणाची उच्च न्यायालयाने चौकशी करावी अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑक्सिजन साठा पुरेपुर आहे, परंतु त्याच्या वितरणात गोंधळ असल्याचे म्हटले होते. यानंतर गोव्यात राजकीय घडामोडी वाढू लागलेल्या आहेत.

सत्ताधारी पक्षातच जोरदार संघर्ष सुरू

गोव्याच्या इतिहासात प्रथमच एखादा आरोग्यमंत्री आपल्याच खात्याच्या कारभारावर संशय व्यक्त करुन उच्च न्यायालयामार्फत चौकशीची मागणी करीत आहे. यामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर राजकीय घडामोडीही वाढू लागल्या आहेत. राज्यात कोविड मृतांची संख्या आणि बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. गेले कित्येक दिवस राज्यात कोविडबाधित मरत चालले आहेत, त्यास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा कारभार जबाबदार असल्याची जोरदार टीका पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केली आहे.

'विश्वजित राणे सत्तरीचे आरोग्यमंत्री आहेत काय'

मोन्सेरात यांच्या या मागणीने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्र्यांनी राज्यात कोविड पसरू नये यासाठी नेमके काय केले? आज जनतेचे प्राण महत्वाचे आहेत. मुख्यमंत्री स्वतः गोमेकॉला भेट देऊन कोविड वॉर्डची पाहणी करतात. मात्र आरोग्यमंत्री आरामात आपल्या केबिनमध्ये बसून आहेत, अशीही टीका मोन्सेरात यांनी केली. तर आपल्या वाळपई मतदारसंघातील रूग्णांसाठी विशेष काळजी घेणारे आरोग्यमंत्री गोव्यातील इतर भागातून आलेल्या सर्वसामान्य रूग्णांकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याची प्रखर टीका त्यांनी केली आहे. ते गोव्याचे नव्हे तर केवळ सत्तरीचे आरोग्यमंत्री आहेत काय?, असा सवालही बाबूश यांनी केला आहे.

'आरोग्यमंत्र्यांनी जनतेच्या जीवाशी खेळू नये'

माजी मंत्री असलेल्या बाबुश मोन्सेरात यांनी सांगितले की, आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे वारंवार गोमेकॉत जाऊन डिन व त्यांच्या उर्वरीत डॉक्टरांना वेगवेगळे आदेश देतात. आरोग्यमंत्री हे गोमेकॉ व सरकार यांच्या दरम्यान सेतु उभारण्याचे काम करीत असतो. परंतु विश्वजित राणे हे आपल्याला विचारल्याशिवाय काही करायचे नाही, असे आदेशच देतात. परिणामी आम्ही फोन केला तर डिन किंवा आरोग्यमंत्री फोन उचलत नाहीत. आरोग्यमंत्र्यांच्या व राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यातील कोविडबाधित मरण पावत असल्याचा सनसनाटी आरोप बाबुश मोन्सेरात यांनी केला आहे. तर 'मुख्यमंत्र्यांनी अकार्यक्षम विश्वजित राणे यांच्याकडील आरोग्य खात्याचा कारभार काढून घ्यावा आणि आरोग्य खात्यासाठी एकच कोणीतरी प्रमुख असावा. मुख्यमंत्री या नात्याने स्वतः डॉ. प्रमोद सावंत हे सारी परिस्थिती हाताळू शकतात व ती हाताळण्यास ते समर्थ आहेत. आरोग्यमंत्र्यांनी जनतेच्या जीवाशी खेळू नये', असे मोन्सेरात यांनी ठणकावून सांगितले.

हेही वाचा - गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.