ETV Bharat / state

सिंधुदुर्गात 45 वर्षावरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठीची प्रतीक्षा संपली

सिंधुदुर्गात 45 वर्षावरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठीची प्रतीक्षा संपली आहे. जिल्ह्यातील 45 वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले आहेत.

People above 45 years of age in Sidhudurg district will be given a second dose of Kovacin
सिंधुदुर्गात 45 वर्षावरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठीची प्रतीक्षा संपली
author img

By

Published : May 10, 2021, 6:55 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे 18 हजार डोस आणि कोव्हॅक्सिनचे 600 डोस प्राप्त झाले आहेत. हे सर्व डोस 45 वर्षावरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठीच वापरण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार कुठे किती डोस दिले आहेत, हे जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

बुस्टर डोस देण्यासाठी एकूण 18 हजार डोस प्राप्त -

लसीच्या तुटवड्यामुळे अनेक लोक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते, त्यांना दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वयोगटासाठी बुस्टर डोस देण्यासाठी एकूण 18 हजार डोस प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 36 लसीकरण केंद्रांद्वारे प्रतिदिन 250 प्रमाणे कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. ही लस केवळ दुसरा डोस देण्यासाठीच वापरली जाणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचा दुसरा डोस आहे, इतर नागरिकांना सदरची लस ही केवळ दुसरा डोस देण्याकरता राखीव असल्याने पहिला डोस देता येणार नाही. 18 ते 24 वयोगटातील नागरिकांना पहिला अथवा दुसरा डोस देता येणार नाही. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. खलिपे यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिह्यासाठी कोव्हॅक्सिनचे 600 डोस प्राप्त झाले आहेत. हे डोस सोबत यादी जाहीर केलेल्या 12 केंद्रांवर 45 वर्षावरील नागरिकांना केवळ दुसरा डोस देण्यासाठीच राखीव आहेत, असेही ते म्हणाले.

कोविशिल्ड देण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रांची यादी -

ग्रामीण रुग्णालयात वैभववाडी, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली, सावंतवाडी आणि शिरोडा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी, वरवडे, कनेडी, फोंडा, खारेपाटण, नांदगाव, कळसुली, पडेल, मिठबाव, शिरगाव, मोंड, फणसगाव, मोरगाव, गोळवण, मसुरे, आचरा, हिवाळे, कडावल, पणदूर, हिर्लोक, कसाल, वालावल, तुळस, आंबोली, मळेवाड आणि निरवडे येथे प्रत्येकी 500 डोस देण्यात आले आहेत.

कोव्हॅक्सिन देण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रांची नावे -

कासार्डे, इळये, चौके, कट्टा, माणगाव, रेडी, आडेली, परुळे, बांदा, सांगेली, तळकट आणि भेडशी या 12 आरोग्य केंद्रांमध्ये कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी 50 डोस देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.