ETV Bharat / state

सिंधुदुर्गात 'पळस मैना' ठरतायत पर्यटकांसाठी आकर्षण - सिंधुदुर्ग बातमी

सिंधुदुर्गातील मालवण रेवतळे भागात हे पक्षी वीजेच्या तारांवर शेकडोच्या संख्येने बसलेले असतात. याचं रेवतळे भागात बाजूलाच कांदळवन असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाला असतात.कीटक, फळे, फुलांमधील मध हे या पक्षांचं आवडते खाद्य आहे. त्यांच्या येण्याची व पळस फुले बहरण्याची वेळ एकच असल्याने या पक्ष्याला ‘पळस मैना’ असे ही म्हणतात.

rosy streling
rosy streling
author img

By

Published : Mar 13, 2021, 3:24 PM IST

सिंधुदुर्ग- पळस मैना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वेगळे नाते आहे. कोकणात पळस फुलू लागते आणि पळस मैना पक्षांचे थवेच्या थवे कोकणात दाखल होतात. सध्या मालवण शहरातील रेवतळे परिसरामध्ये या पळस मैना पक्षांचे नयनरम्य थवे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. या पक्षांचा किलबिलाट, आकाशातील थव्यांनी केली जाणारी कसरत पाहताना सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फिटत आहे. या परदेशी पाहुण्यांच्या आगमनाने मालवण वासियांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.

'रोझी स्टर्लिंग’ अर्थात पळस मैना काय आहे ?
युरोप, मध्य आशिया, तुर्कस्तान या भागातून हजारो किलोमीटरचे अंतर कापून सिंधुदुर्गात हजारोच्या संख्येने परदेशी पाहुणे दाखल झाले आहेत. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पाहुण्यांचे थवेच्या थवे दिसून येत आहे. ‘रोझी स्टर्लिंग’ अर्थात पळस मैना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पाहुण्यांचा हा थाट काही औरच आहे. सिंधुदुर्गातील मालवण रेवतळे भागात हे पक्षी वीजेच्या तारांवर शेकडोच्या संख्येने बसलेले असतात. याचं रेवतळे भागात बाजूलाच कांदळवन असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाला असतात. कीटक, फळे, फुलांमधील मध हे या पक्षांचं आवडते खाद्य आहे. त्यांच्या येण्याची व पळस फुले बहरण्याची वेळ एकच असल्याने या पक्ष्याला ‘पळस मैना’ असे ही म्हणतात.

या पक्षाला दक्षिण भारतात यांना "मधुसारिका' असे नाव
रोझी स्टर्लिंग अर्थात पळस मैना पक्ष्याचे डोके व मान काळीभोर असते. गळा व पोट चमकदार गुलाबी असून पाठीवर पांढरी-गुलाबी झालर असते. डोक्‍यावर मध्यभागी आकर्षक तुरा, चोच तीक्ष्ण असून पंख काळे-तपकिरी, किंचित निळे-हिरवट असतात. नर व मादी सारखेच असून मादीचा तुरा थोडा लहान असतो. दक्षिण भारतात यांना "मधुसारिका' असे म्हटले जाते. यांचे समूहनृत्य विहंगम असतात. फुलझाडांकडे आकर्षित होणाऱ्या 'रोझी स्टर्लिंग' हे पक्षी सध्या मालवणात स्थिरावले आहेत. रेडी रेवस या सागरी महामार्गा लगत असलेल्या विजेच्या तारांवर दररोज सकाळ, संध्याकाळी हजारो पक्ष्यांची शाळा भरते. पळस मैना हजारांच्या संख्येत ठरलेल्या वेळेतच एकत्र येऊन हवाई कसरत करतात. हे विलोभनीय दृश्य सर्वांना आकर्षीत करणारे ठरत आहे.

हे आहेत या पक्ष्यांचे खाद्य आहे
संध्याकाळच्या वेळी मालवण मधल्या या रेवतळे भागात हा पक्षी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांच्या गाड्या लागलेल्या असतात. या पक्षांचा किलबिलाट, येथील वीजांच्या तारांवर बसणं आणि क्षणात खारफुटीच्या वनांमध्ये लुप्त होऊन जाणं. सर्वांना आनंद देऊन जाते. शेतातील कीटक, खाडी मधील कीटक हे या पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. अशी माहिती अभ्यासक अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.
पक्षी पाहण्यासाठी लहान मुले करतात गर्दी
मालवण मधील पर्यटन व्यावसायिक सांगतात की, या पक्षांचा आवाज ऐकताना एक वेगळाच आनंद मिळतो. मालवणला नयनरम्य असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे मालवण मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. याठिकाणी जलक्रीडेचा आनंद घेतात. या पर्यटकांना या पाहुण्या पक्षांचा देखील आनंद घेता येतो. तसेच हे पक्षी पाहण्यासाठी लहान मुले देखील मोठ्या संख्येने याठिकाणी येतात.

हेही वाचा-महाराष्ट्रात फक्त मराठीच..! कर्वेनगरच्या उड्डाणपुलावरील हिंदी सुविचाराला मनसेने फासले काळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.