ETV Bharat / state

Parth Ship Oil Spill: अखेर पार्थ जहाजातून तेल गळतीला सुरुवात; सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याला बसणार फटका

विजयदुर्ग जवळ समुद्रात बुडालेल्या 'पार्थ' (Parth Ship oil tanker accident Vijaydurg) या तेल वाहू जहाजातून तेलगळतीला सुरुवात (Parth oil Ship tanker starts oil spill) झाली आहे. गोव्यातील समुद्र विज्ञान संस्थेने (Institute of Ocean Sciences Goa) दिलेल्या माहितीनुसार, या जहाजातून होणारी तेल गळती अपघाताच्या ठिकाणापासून दक्षिण पूर्व दिशेला पसरणार आहे. त्यामुळे या तेल गळतीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील (Sindhudurg and Goa state affect oil spill) समुद्र किनाऱ्यांना बसणार आहे.

अखेर पार्थ जहाजातून तेल गळतीला सुरुवात
अखेर पार्थ जहाजातून तेल गळतीला सुरुवात
author img

By

Published : Sep 20, 2022, 6:56 PM IST

सिंधुदुर्ग: विजयदुर्ग जवळ समुद्रात बुडालेल्या 'पार्थ' (Parth Ship oil tanker accident Vijaydurg) या तेल वाहू जहाजातून तेलगळतीला सुरुवात (Parth oil Ship tanker starts oil spill) झाली आहे. गोव्यातील समुद्र विज्ञान संस्थेने (Institute of Ocean Sciences Goa) दिलेल्या माहितीनुसार, या जहाजातून होणारी तेल गळती अपघाताच्या ठिकाणापासून दक्षिण पूर्व दिशेला पसरणार आहे. त्यामुळे या तेल गळतीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील (Sindhudurg and Goa state affect oil spill) समुद्र किनाऱ्यांना बसणार आहे. विजयदुर्ग किनाऱ्यापासून ४० ते ५० वाव क्षेत्रामध्ये समुद्रात दुबईहून बेंगलोरच्या दिशेने जाणारे पार्थ नावाचे जहाज बुडाले आहे. हे तेल वाहू जहाज बुडाल्याने किनारी भागामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या जहाजातून कोणत्याही क्षणी तेल गळती होऊ शकते असा इशारा देण्यात आला होता. अखेर या तेल गळतीला सुरुवात झाली आहे. १०१ मीटर लांबीचे हे तेल वाहू जहाज आहे. १६ सप्टेंबर रोजी ते अपघातग्रस्त झाले होते. रत्नागिरी कोस्ट गार्डकडून या जहाजावरील कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले होते. (Latest News from Sindhudurg)

तेल गळतीचा परिणाम कोकण किनारपट्टी - या जहाजातील तेल गळतीचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होणार आहे. कोकणातील मासेमारीची काही प्रमाणात यामुळे धोक्यात येऊ शकते. तर जहाज अपघातग्रस्त झालेल्या ठिकाणापासून दक्षिण पूर्व दिशेला म्हणजे आग्नेय दिशेला या जहाजातील तेल पसरणार असल्याची माहिती गोवा समुद्री विज्ञान संस्थेने दिली आहे. तेल गळतीपासून होणारे परिणाम रोखण्यासाठी रत्नागिरी कोस्ट गार्डकडून या भागात २५० लिटर ऑईल स्पील डिस्परसंट OSD ची फवारणी हेलिकॉप्टरमधून करण्यात आली आहे. तेल गळतीच्या ठिकाणी पॅण्डी PANDI क्लबच्या स्वच्छता पथकाकडूनही आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

पार्थ जहाजातून तेल गळतीला सुरुवात झाल्यानंतर बचावकार्य करताना रत्नागिरी कोस्ट गार्डची नौका

प्राधिकरणच्या बैठकीत तेल गळतीचा आढावा - दरम्यान, या पार्श्वभूमीवर या तेल गळतीच्या स्थितीचा सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ, पोलिस निरीक्षक सागरी सुरक्षा ब अनिल जाधव, वेंगुर्ल्याचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव, वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे, देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजर्षी सामंत सहभागी होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.