सिंधुदुर्ग - अभियंत्यावर चिखलफेक करत मारहाण केल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंसह त्यांचे साथीदार अटकेत आहेत. मंगळवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सर्व आरोपींना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र अटकेत असतानादेखील कार्यकर्त्यांच्या अंगातली मस्ती कायम असल्याचे चित्र दिसून येतेय.
यातील एक आरोपी असलेले कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांना म्हणे हायवेवर प्रेस घ्यायची आहे. तसेच हायवेची पार्टी देखील करायची आहे. हे सांगताना काही एक घाबरायची गरज नसल्याचेही नलावडे आवर्जून सांगतात. नलावडे यांचे हे वक्तव्य पत्रकारांच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले आहे.
नितेश राणेंनी देखील यावेळी कॅमेऱ्यासमोर चांगली पोज दिली. चांगला फोटो आला पाहिजे, असेही ते यावेळी पत्रकारांना म्हणाले. त्यामुळे नितेश राणेंनी लोकांसाठी कायदा हातात घेतल्याच्या कितीही वलग्ना केल्या, तरी यात स्टंट बाजीचाच अधिक वास येतोय, अशी चर्चा सध्या नागरिकांमधून सुरू आहे.