ETV Bharat / state

Nitesh Rane Wrote Letter To CM : '..तर मग विद्यार्थ्यांना औरंजेबाच्या 'फतवा-एआलमगीरी'चे पठण करायला लावायचे का?' - मुंबई मनपा शाळा भगवत गीता पठण

आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Nitesh Rane Wrote Letter To CM Uddhav Thackeray ) यांना एक पत्र लिहिलेले आहे. या पत्रात त्यांनी समाजवादी पार्टीकडून ( Samajwadi Party Oppose Bhagwat Gita Reading ) भगवत गीता पठण आला झालेल्या विरोधाला न जुमानन्याची विनंती केली आहे.

Nitesh Rane Wrote Letter To CM
Nitesh Rane Wrote Letter To CM
author img

By

Published : Feb 20, 2022, 3:43 PM IST

Updated : Feb 20, 2022, 5:33 PM IST

सिंधुदुर्ग - आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Nitesh Rane Wrote Letter To CM Uddhav Thackeray ) यांना एक पत्र लिहिलेले आहे. या पत्रात त्यांनी समाजवादी पार्टीकडून ( Samajwadi Party Oppose Bhagwat Gita Reading ) भगवत गीता पठण आला झालेल्या विरोधाचा संदर्भ दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हणून भगवद्गीता पटनाला होणारा विरोध आपण जुमानणार नाहीत, असेही आमदार नितेश राणे यांनी या पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया

पत्रात काय म्हणाले नितेश राणे -

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी महानगर पालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणच्या ठरावाची सुचना भाजपच्या योगिताताई कोळी यांनी महापौरांना केली होती. मात्र, लगेच समाजवादी पार्टीकडून यावर आक्षेप व विरोध केला जातो आहे. खरतंर हे दुर्दैवी आणि दुख:द असल्याचे नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मला खात्री आहे की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून आपण भगवत् गीता पठणला होणाऱ्या विरोधापुढे झुकणार नाहीत. योगिताताई कोळी यांच्या सुचना मान्य करण्यास आपण लगेच निर्देशीत कराल, अशी आशा बाळगतो असे नितेश राणेंनी पत्रात म्हटले आहे.

महानगर पालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणच्या ठरावाच्या ठरावाची सुचना भाजपच्या योगिताताई कोळी यांनी महापौरांना केली होती. मात्र, लगेच समाजवादी पार्टीकडून यावर आक्षेप व विरोध केला जातो आहे. खरतंर हे दुर्दैवी आणि दुख:द आहे. ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीतील योग, ज्ञान जगाने स्वीकारले, अंगीकारले त्यात कोणत्याही धर्माचा अडसर नाही. त्याचप्रमाणे जगभरातील विद्यापीठे, तत्त्ववेत्ते आणि विचारवंत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात भगवत् गीता या ग्रंथाला अनन्य साधरण महत्त्व आहे. अमेरिकेतील सेटॉन हॉल युनिव्हर्सिटीत तर भगवत् गीता आणि मॅनेजमेंट, अशा पद्धतीचे कोर्सेस शिकवले जातात. संपूर्ण जग तत्वज्ञान ते कॉरपोरेट अशा सर्वच क्षेत्रात भगवत् गीतेचे महत्व मान्य करत आहे. कारण, हा ग्रंथ मानवी कल्याणाचा मार्ग सांगतो असे नितेश राणेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Nitesh Rane Wrote Letter To CM
नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भगवद् गीता पठण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडेल. यामध्ये कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. परंतू आपल्याच देशात जर गीता पठणला विरोध होत असेल तर मग विद्यार्थ्यांना औरंजेबाचे "फतवा-एआलमगीरी' चे पठण करायला लावायचे का? जेणेकरुन मुख्तार अन्सारी सारखी माणसं यांना घरोघरी जन्माला घालता येतील? असा सवालही राणेंनी या पत्रातून केला आहे. भगवत् गीता पठणला होणाऱ्या विरोधापुढे आपण झुकणार नाहीत. योगिताताई कोळी यांच्या सुचना मान्य करण्यास आपण लगेच निर्देशीत कराल, अशी आशा बाळगतो, असे नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - Prakash Raj Meet KCR : अभिनेते प्रकाश राज यांनी केले मुख्यमंत्री के चंद्रशेकर राव यांचे स्वागत

Last Updated : Feb 20, 2022, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.