सिंधुदुर्ग - माजी खासदार निलेश राणे यांनी दुपारनंतर वरवडे गावात मतदानाचा हक्क बजावला आहे.
नितेश राणेंच्या प्रचारात व्यस्त असलेल्या निलेश राणेंनी दुपारनंतर वरवडे गावात मतदानाचा हक्क बजावला. नितेश राणेंचा ६० ते ७० हजार मतांनी विजय नक्की होईल असा विश्वास यावेळी निलेश राणेंनी व्यक्त केला. कणकवलीत राणेविरोधात येवून राळ पेटवणाऱ्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचारसुद्धा निलेश राणेंनी घेतला. राणेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देवू असे सांगत उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येऊन फक्त राणेंवर बोलले. कोकणात येवून कोकणातल्या माणसावर बोलणाऱ्याचा कोकणी जनता नक्कीच समाचार घेईल, असा विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केला.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक : नारायण राणे, नितेश राणेंनी बजावला मतदानाचा हक्क
हेही वाचा - सिंधुदुर्गात मतदानाला सुरुवात; सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह