ETV Bharat / state

VIDEO: नारायण राणे आणि उदय सामंत आमनेसामने, राणेंच्या एका प्रश्नाने सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गदारोळ!

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चांगलाच गदारोळ झाल्याचे चित्र सोमवारी बघायला मिळाले. निधी देण्याच्या मुद्द्यावरून पालकमंत्री उदय सामंत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विचारलेल्या प्रश्नावरून गदारोळाला सुरूवात झाली. यावेळी शिवसेनेचे सदस्य आणि आमदार नितेश राणे यांच्यातही चांगलीच खडाजंगी झाली.

नारायण राणेंच्या प्रश्नाने सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गदारोळ!

author img

By

Published : Nov 16, 2021, 3:23 PM IST

Updated : Nov 16, 2021, 3:40 PM IST

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चांगलाच गदारोळ झाल्याचे चित्र सोमवारी बघायला मिळाले. निधी देण्याच्या मुद्द्यावरून पालकमंत्री उदय सामंत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विचारलेल्या प्रश्नावरून गदारोळाला सुरूवात झाली. यावेळी शिवसेनेचे सदस्य आणि आमदार नितेश राणे यांच्यातही चांगलीच खडाजंगी झाली.

VIDEO : नारायण राणेंच्या प्रश्नाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गदारोळ!

सभागृहात झाला जोरदार गोंधळ
जिल्हा नियोजनचे अध्यक्ष उदय सामंत नियोजनचा निधी परस्परविरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांना देतात असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. यावेळी सभागृहात गदारोळ झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर नियोजनचा निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना परस्पर देण्यात येत असल्याचा आरोप केला. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. राणेंनी पेपरमध्ये आलेल्या बातमीचा पुरावा देत हा आरोप केला. यावेळी आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे नियोजन समितीचे सदस्य यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी उदय सामंत यांनी सेनेच्या सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं. मात्र नियोजनाचा निधी कुठेही परस्पर नियोजन समितीच्या सभेशिवाय दिला जात नसल्याचे सांगितले. पेपरमधील बातमी ही शिवसेनेच्या मेळाव्यात बोललो तेव्हाची होती. असा उल्लेख मी कुठे केला नसल्याचं उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

पारकर-राणे आमने-सामने
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ. बुडविणाऱ्यांनी हे आम्हाला शिकवू नये असा टोला शिवसनेचे नियोजनचे सदस्य संदेश पारकरांना लगावला. यावेळी पारकरांनी हा सदस्यांचा अपमान असल्याचं म्हटलं. यावेळी आमदार नितेश राणे त्यांना तुम्ही लोकांना लूटल्याची लिस्ट देऊ असे म्हणाले. म्हणून तर कणकवलीतील लोकांनी पाडलं असेही राणे यावेळी म्हणाले. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. सिंधुदुर्ग जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या शेतकऱ्यांची थकीत रक्कमेच्या मुद्द्यावरूनही सभागृहात गदारोळ झाला.

विकासकामे पालकमंत्र्यांनीच रोखली - नितेश राणे
कुडाळ, मालवणचे आमदार वागदे ओसरगावमध्ये सुचविली कामे थांबवतात. हे योग्य आहे काय? पालकमंत्री त्या पत्राला स्वतःचे पत्र जोडून काम थांबवा असे आदेश देतात. नेहमी इतर कामांसाठी पालकमंत्री तुम्ही फोन करता तसा फोन करून जरी मला विचारले असते तर तुम्हाला सांगितले असते. आता त्या दोन गावातील लोक गेटवर येऊन आंदोलन करत आहेत. त्यांना तुम्हीच काय ते उत्तर द्या..! कुडाळाचे आमदार वैभव नाईक यांनी अशी पत्रे देणे थांबवावीत आणि आपल्या मतदारसंघात जी कामे प्रलंबित आहेत ती पहावी असे नितेश राणे यावेळी म्हणाले.

Last Updated : Nov 16, 2021, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.