ETV Bharat / state

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस... मालवणमधील पुरातन नाभानाथ मंदिर कोसळले - नाभानाथ मंदिर बातमी

पावसामुळे समुद्राच्या अजस्र लाटांचा तडाखा किनारपट्टी भागात सुरू होता. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. यात साळेल येथील सहदेव आचरेकर यांच्या घरावर रतांब्याचे झाड पडून नुकसान झाले. कोळंंब न्हिवे येथील स्वप्नील परब यांच्या राहत्या घरावर फणसाचे झाड पडून नुकसान झाले.

nabhanath-temple-collapsed-in-heavy-rain-at-sindhudurg
मालवणमधील पुरातन नाभानाथ मंदिर कोसळले
author img

By

Published : Jul 8, 2020, 12:44 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. आजच्या तिसऱ्या दिवशीही पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. पावसामुळे नद्या, नाले दुधडी भरुन वाहत आहेत. मालवण शहरातील मेढा येथील पुरातन नाभानाथ मंदिर मुसळधार पावसात कोसळले. जेसीबीच्या साहाय्याने या मंदिराचे दगड हटविण्यात आले.

पावसामुळे समुद्राच्या अजस्र लाटांचा तडाखा किनारपट्टी भागात सुरू होता. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. यात साळेल येथील सहदेव आचरेकर यांच्या घरावर रतांब्याचे झाड पडून नुकसान झाले. कोळंंब न्हिवे येथील स्वप्नील परब यांच्या राहत्या घरावर फणसाचे झाड पडून नुकसान झाले. कुणकवळे येथील सूर्यकांत निकम यांच्या राहत्या घरावर दुपारी सागाच्या झाडाची फांदी पडून नुकसान झाले आहे. संबंधित तलाठ्यांनी घटनास्थळी जात नुकसानीची पंचयादी केली आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यात मेढा येथील पुरातन नाभानाथ मंदिर कोसळल्याची घटना घडली आहे. हे पुरातन मंदिर जीर्ण झाले होते. मालवणवासीयांच्या गावरहाटीत या मंदिराला महत्वाचे स्थान आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.