सिंधुदुर्ग : राज्य सरकार कोसळल्यानंतर शिंदे सरकार अस्तित्वात आले. यानंतर रखडलेली सिंधुदुर्ग जिल्ह्याची डीपीडीसी बैठक (DPDC meeting of Sindhudurg district) आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut had verbal altercation) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे वातावरण चांगले तापले. Vinayak Raut Vs Narayan Rane
खासदार विनायक राऊत यांनी विकास कामांना स्थगिती देण्याच्या विषयावरून बैठकीच्या सुरुवातीलाच प्रश्न उपस्थित केला. मागच्या डीपीडीसी सभेमध्ये मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती का दिली गेली ? असा प्रश्न विनायक राऊत यांनी विचारताच, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभेच्या अजेंड्यावरून सभेला सुरुवात होऊ द्या असे म्हटले. तसेच हा विषय आयत्यावेळी घेतल्या जाणाऱ्या विषयांमधला आहे, अशी सूचना राणे यांनी केली.
यावर आक्रमक झालेल्या खासदार विनायक राऊत यांनी मी हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला आहे. आपण पालकमंत्री आहात का? असा सवाल करत राणेंवर प्रति हल्ला केला. यामुळे सभागृहात काही काळ चांगलेच वातावरण तापले होते. Vinayak Raut Vs Narayan Rane