ETV Bharat / state

महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून जमिनी गेलेल्या प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही. गेली दोन वर्षे शेतकरी हक्काच्या मोबदल्यासाठी लढत आहेत.

mns-protest-in-sindhudurg
मनसेचे घंटानाद आंदोलन
author img

By

Published : Jan 4, 2020, 12:54 PM IST

सिंधुदुर्ग- राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी शेकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या मात्र, नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडले. जोपर्यंत न्याय व मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

मनसेचे घंटानाद आंदोलन

हेही वाचा- चाकण एमआयडीसीमधील पुठ्ठ्यांच्या कारखान्याला भीषण आग, ८ तासानंतर आग आटोक्यात

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून जमिनी गेलेल्या प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिकांच्या जमीनी संपादित करण्यात आल्या. मात्र, नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही. गेली दोन वर्षे शेतकरी हक्काच्या मोबदल्यासाठी लढत आहेत. शासनदरबारी फक्त आश्वासने मिळतात. संपादित जमिनीमध्ये पोलीस दमदाटीने ठेकेदार कंपनीने रस्ताही बनवून घेतला आहे. आता शेतकऱ्यांजवळ जमिनीही नाहीत व मोबदलाही नाही, अशी परिस्थिती आहे. सामान्य जनतेचा आता सरकारी यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळवून देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचे व या आंदोलनाची दखल न घेतल्यास उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील बांदेकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:अँकर /- मुंबई -गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांना जो पर्यंत न्याय व त्यांचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घंटानाद आंदोलना वेळी दिला .कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन छेडले आहे .या आंदोलनात कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली,नगरसेवक सुनील बांदेकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Body:V /O - जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून जमिनी गेलेल्या प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिकांच्या जमीनी संपादित करण्यात आल्या मात्र नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही .गेली दोन वर्षे शेतकरी आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी लढत आहे .शासनदरबारी फक्त आश्वासने मिळतात.संपादीत जमिनी मध्ये पोलीस दमदाटीने ठेकेदार कंपनीने रस्ताही बनवून घेतल्याने आता शेतकऱ्यांजवळ जमिनी ही नाहीत व मोबदला ही नाही अशी परिस्थिती आहे .सामान्य जनतेचा आता सरकारी यंत्रणेवर विश्वास राहीलेला नाहीय .त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळवून देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचे व या आंदोलनाची दखल न घेतल्यास उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला .Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.