ETV Bharat / state

'वडील मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, हे आमदार नितेश यांनीच दाखवून दिले'

शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार निश्चितच पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल या भीतीने भाजपचे अनेक आमदार व भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यांना थांबविण्यासाठी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना जिल्ह्यात पत्रकार परिषद घ्यावी लागली.

शिवसेना आमदार वैभव नाईक
शिवसेना आमदार वैभव नाईक
author img

By

Published : Dec 1, 2020, 8:35 PM IST

Updated : Dec 1, 2020, 9:15 PM IST

सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री होण्याची अनेकदा इच्छा व्यक्त केलेल्या नारायण राणे यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा त्यांच्या मुलानेच खोडला. आमदार नितेश राणे यांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होऊ शकतात, असा दावा केल्यावरून शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी त्यांना टोला लगावला. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार निश्चितच पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल या भीतीने भाजपचे अनेक आमदार व भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यांना थांबविण्यासाठी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना जिल्ह्यात पत्रकार परिषद घ्यावी लागली.

वडील मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, हे आमदार नितेश यांनीच दाखवून दिले

पंचवीस वर्षे राणेंना जमले नाही, ते मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात केले-

सिंधुदुर्गातील कार्यकर्ते जनता व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राणेंची भूमिका मान्य नसते. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना जिल्ह्यात आणून भाजपची भूमिका मांडावी लागली, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. नाईक पुढे म्हणाले, की रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या टिकेपूर्वी त्यांनी माहिती घेणे गरजेचे होते. गतवर्षीची भातशेती नुकसान भरपाई पूर्णपणे शेतकऱ्यांना देण्यात आली. त्याच पद्धतीने या वर्षीचीही भातशेतीच्या नुकसानीची भरपाई दिली जाईल. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली. हे जिल्हावासीयांना महाविकास आघाडीकडून मिळालेले महत्त्वाचे काम आहे. गेली पंचवीस वर्षे राणेंना जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी एक वर्षात करून दाखविले.

केंद्र सरकारमुळे काजू व आंबा उत्पादक अडचणीत-
शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले, की काजू बियाला ​५ टक्के जीएसटी लागू केला. त्यातील अडीच टक्के जीएसटीचा परतावा सरकारकडून दिला नाही. हा जर परतावा केंद्र सरकारने दिला तर काजू व्यवसायिक अडचणीत सापडले त्यांना दिलासा मिळाला असता. आंबा व काजू पिक विम्याचे जनतेला पैसे मिळायला लागले. मात्र, निकषात बदल केल्यामुळे यावर्षी आंबा व काजूचे पीक विमा शेतकऱ्यांनी काढले नाहीत. यासाठी केंद्राचे निकष बदलायला हवेत. याकडे भाजपचे दुर्लक्ष होत असल्याची टीका नाईक यांनी केली. सिंधुदुर्गात गेल्या ​९ महिन्यात कोरोनामुळे अनेक विकास कामे थांबून राहिली. यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खराब झाली. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणण्यात आली. त्यामुळे येत्या महिन्याभरात पुरवणीमधून​ ​​५० कोटी व बजेटमधून ​१०० कोटींचा निधी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी मंजूर होईल, असेही नाईक म्हणाले. मच्छीमारांसाठी ​६५ कोटींचे पॅकेज आमच्या सरकारने जाहीर केले. त्यातील दहा ते बारा कोटी सिंधुदुर्गातील मच्छीमारांना द्यायची जबाबदारी आमची आहे. व मच्छीमारांना ही मदत आम्ही मिळवून देऊ, असा त्यांनी दावा केला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरील आरोपाबाबत नाईक यांचा रवींद्र चव्हाण यांना टोला

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आरोप करत असताना बँकेच्या कारभाराबाबत रवींद्र चव्हाण यांनी अगोदर माहिती घ्यावी. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांच्या पाठीशी आम्ही सर्व जण आहोत. मात्र, जिल्हा बँकेतून कर्ज दिलेल्या ​१२ बोलेरो गाड्या व नितेश राणे यांची गाडी यांनाही जप्ती आल्याची माहिती नाईक यांनी दिली. कोणीतरी माहिती देतो, म्हणून शेतकऱ्यांच्या बँकेवर आरोप नको. येत्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. कुणीही लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी समोर भाजपची पॉलिसी चालणार नसल्याचा टोला नाईक यांनी लगावला. जिल्हा बँकेत कोणी किती कर्ज घेतले? त्या कारणासाठी कुणी कसा दबाव आणला याची माहिती सतीश सावंत यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांनी घ्यावी, असा टोला नाईक यांनी लगावला.

जिल्ह्यात भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना भाताचा योग्य मोबदला मिळावा व खासगी व्यावसायिकांनी भात खरेदी करून शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये नोव्हेंबर महिन्यापासूनच भात खरेदी सुरू केली. त्याची रविंद्र चव्हाण यांनी माहिती घ्यावी, असेही आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले.

Last Updated : Dec 1, 2020, 9:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.