ETV Bharat / state

माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वॅब तपासणी करून घ्या; आमदार वैभव नाईक यांचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी ते जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

Vaibhav Naik
आमदार वैभव नाईक
author img

By

Published : Jul 21, 2020, 7:00 PM IST

सिंधुदुर्ग - माझ्या निष्काळजीपणामुळे मला काही कोरोनाची लक्षणे जाणवली. कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे सोमवारी जिल्हा रूग्णालयात दाखल झालो. मागील काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे जाणवल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल व्हा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वॅब तपासणी करून घ्या

शिवसेना आमदार वैभव नाईक सध्या जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. सोमवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी आज एक व्हिडिओ जाहीर करत जिल्हावासीयांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जावू नये, माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तरी माझी प्रकृती उत्तम आहे. मी लवकरच बरा होईल याची मला खात्री आहे. मात्र, माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांना स्वत:मध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांनी जिल्हा रूग्णालयाशी संपर्क करावा, असे नाईक म्हणाले.

माझ्या कुटुंबातीलही सर्वांची आज चाचणी करण्यात आली आहे. माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल, तर मी सर्वांची क्षमा मागतो. मात्र, माझ्या संपर्कात आलेल्यांनी नक्की जिल्हा रूग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.