ETV Bharat / state

'भास्कर जाधव हे सोंगाड्या' म्हणत नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल - नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज सोंगाड्या म्हणत आमदार भास्कर जाधव यांचा एकेरी उल्लेख करत अत्यंत खालच्या शब्दात टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे सोंगाड्यांना किती महत्व द्यायचे हे महाविकास आघाडीचा प्रश्न असल्याचे मत नितेश राणेंनी यावेळी व्यक्त केले आहे.

आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे
author img

By

Published : Jul 11, 2021, 8:45 PM IST

सिंधुदुर्ग - भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज सोंगाड्या म्हणत आमदार भास्कर जाधव यांचा एकेरी उल्लेख करत अत्यंत खालच्या शब्दात टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे सोंगाड्यांना किती महत्व द्यायचे हे महाविकास आघाडीचा प्रश्न असल्याचे मत नितेश राणेंनी यावेळी व्यक्त केले आहे. तर आपापसातील भांडणातच हे सरकार कोसळेल, असेही ते यावेळी म्हणाले.

भास्कर जाधव हे सोंगाड्या म्हणत नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

'सोंगाड्यांना किती महत्व द्यायचे हा महाविकास आघाडीचा प्रश्न'
महाविकास आघाडीने सोंगाड्यांना किती महत्व द्यायचे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत भाजपा आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा शिवसेना आमदार भास्कर जाधवांवर निषाणा सााधला. मी पहिल्या दिवशी बोललो हा सोंगाड्या माणूस आहे. कोकणातली जनता भास्कर जाधवांना चांगली ओळखते. कोणाला किती महत्व द्यायचे हे आपण ठरवायचे. जो माणूस सतत आपली सोंग बदलत असतो अशा सोंगाड्याला तमाशात किती महत्व असते हे आपणाला माहित आहे. म्हणुन महाराष्ट्राच्या राजकारणात असे सोंगाड्यांना किती महत्व द्यायचे हे महाविकास आघाडीचा प्रश्न असल्याचे मत नितेश राणेंनी नोंदवले. भास्कर जाधव यांना कोकणात काय किंमत आहे हे सर्वांना माहित आहे. दोन दिवसाचे त्यांनी घेतलेले ते सोंग आहे. आज ते माकड असतील तर उद्या गाढव असतील, असे म्हणत जाधव यांचा आमदार नितेश राणे यांनी थेट एकेरी उल्लेख करत टीका केली आहे.

'आपापसातील भांडणातच हे सरकार पडेल'
नाना पटोले यांनी पुण्यात केलेल्या वक्तव्यावर भाजपा खासदार यांनी सुचक वक्तव्य केले आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही बोलतोय यांना महाराष्ट्राच्या विकासाचे काही पडलंय का, आपसात हे कपडे फाडत असतात सोंग घेत असतात म्हणुन हे सरकार हे आपापसातल्या भांडणातून पडेल आम्हाला काही करावे लागणार नाही. आम्ही भाजपा म्हणुन लोकांची सेवा करतोय हे लोकं भांडत असल्याचा टोला भाजपा आमदार नितेश राणेंनी लगावला आहे.

हेही वाचा - तेलकट थापा मारून केंद्राचे पाप झाकता येणार नाही; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हेही वाचा - मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय - राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.