ETV Bharat / state

'कणकवलीतील महामार्ग भिंतप्रकरणी सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार' - पालकमंत्री उदय सामंत

जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. हे काम केंद्र सरकारच्या अखत्यारितील असल्याने केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री उदय सामंत
पालकमंत्री उदय सामंत
author img

By

Published : Jul 16, 2020, 12:02 PM IST

सिंधुदुर्ग - कणकवली शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाची भिंत कोसळल्याच्या घटनेची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे. यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. हे काम केंद्र सरकारच्या अखत्यारितील असल्याने केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री उदय सामंत

कणकवली शहरातील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत दोन दिवसांपूर्वी कोसळली होती त्या घटनेची पाहणी सामंत यांनी आज केली. यावेळी ते म्हणाले, कणकवली शहरातील उड्डाणपूल जोड रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी कणकवलीकर यांनी केल्या होत्या. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी हायवे अधिकारी आणि हायवे ठेकेदार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावून कामातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले होते, तरीही चौपदरीकरण कामात दर्जा राखण्यात आलेला नाही.

चौपदरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याने नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. या अनुषंगाने आज मी हायवेच्या मुख्य अभियंत्यांशी बोलणार आहे, त्यानंतर कणकवलीतील घटनेची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होईल आणि यातील दोषींवर कारवाई होण्यासाठी आम्ही ठाम भूमिका घेणार आहोत, असेही ते म्हणाले. पालकमंत्री यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, उपविभागीय पोलीस अधिकारी कटेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.