सिंधुदुर्ग: जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयात निवडणूक प्रक्रिया झाली. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादामुळे निवडणूक चांगलीच चर्चेत होती. राणे विरुध्द महाविकास आघाडी असा सामना पहायला मिळाला. या निवडणुकीत राणेंनी 11 विरूध्द 8 अशा फरकाने विजय मिळवला आणि महाविकास आघाडीला घक्का दिला होता.
महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत यांचा राणे समर्थक असलेले विठ्ठल देसाई यांनी पराभव केला. आज बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली यात कणकवलीतील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर चाकू हल्ला प्रकरणात नाव आलेले मनिष दळवी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान संचालक अतुल काळसेकर यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.