मुंबई - महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी उत्साहात मतदान झाले अन् सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. आज (गुरूवार) निकालाचा महावार असून जनतेने कोणाच्या बाजुने कौल दिलाय हे आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. यात कोकणाचा गड हा शिवसेनेने राखल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, शिवसेनेने राणेंना केलेला विरोध हा सेनेच्या अंगलट आला असून नितेश राणे हे कणकवलीतून विजयी झाले आहेत.
रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या कोकण विभागात एकूण 39 मतदारसंघ आहेत. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. हा बालेकिल्ला शिवसेनेने राखला आहे.
UPDATES -
- उरणमधून अपक्ष महेश बालदी विजयी
- श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विजयी
- गुहागरमधून सेनेचे भास्कर जाधव विजयी
- रत्नागिरीतून सेनेचे उदय सामंत विजयी
- सावंतवाडीतून दिपक केसरकर विजयी
- कुडाळमधून शिवसेनेचे वैभव नाईक विजयी
- कणकवलीतून नितेश राणे विजयी
- कल्याण ग्रामीणमधून मनसेचे प्रमोद पाटील विजयी
- शिवसेनेला धोबीपछाड देत नितेश राणे विजयी
- भास्कर जाधव आघाडीवर
- पालघर - शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी
- कणकवली मतदारसंघातून नवव्या फेरीत भाजपचे नितेश राणे 13905 मतांनी आघाडीवर
- आठव्या फेरी अखेर शिवसेनेचे वैभव नाईक यांना 3,094 मतांची आघाडी
- सावंतवाडी मतदारसंघातून सातव्या फेरीअखेर शिवसेनेच्या दीपक केसरकर यांना 4610 मतांची आघाडी
- कणकवली मतदारसंघातून आठव्या फेरीत भाजपचे नितेश राणे 12915 मतांनी आघाडीवर
- तिसऱ्या फेरीत भाजपचे नितेश राणे 4283 मतांनी आघाडीवरकणकवलीतून नितेश राणे 6000 मतांनी आघाडीवर
- पहिल्या फेरीत अदिती तटकरे आघाडीवर
- पोस्टल मतमोजणीला सुरुवात
कोकण विभागातील 2014 ची आकडेवारी -
भाजप- 10, शिवसेना - 14, राष्ट्रवादी - 8, काँग्रेस - 1, इतर - 6
लक्षवेधी लढत -
- कणकवली - नितेश राणे (भाजप) Vs सतिष सावंत (शिवसेना)
- अलिबाग - महेंद दळवी (शिवसेना) Vs सुभाष पाटील (शेकाप)
- पेण - रविंद्र पाटील (भाजप) Vs धर्येशील पाटील (शेकाप)
- श्रीवर्धन -अदिती तटकरे (राष्ट्रवादी) Vs विनोद घोसाळकर ( शिवसेना)
- दापोली - योगेश कदम (शिवसेना) Vs संजय कदम (राष्ट्रवादी)