ETV Bharat / state

सिंधुदुर्ग दौरा अर्धवट सोडून नारायण राणे तातडीने दिल्लीकडे रवाना - Narayan Rane news

माजी मुख्यमंत्री असलेल्या राणे यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, असे संकेत होते. मात्र अद्याप याला मूर्तरूप आलेले नाही. या विस्तारात ही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा नेते म्हणूनही त्यांची राज्यात ओळख आहे. मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाचा विचार करता त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय विरोध सर्वांसमोर उघड आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते.

नारायण राणे तातडीने  दिल्लीकडे रवाना
नारायण राणे तातडीने दिल्लीकडे रवाना
author img

By

Published : Jun 15, 2021, 12:07 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपा नेते नारायण राणे जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडत तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंचा सहभाग होण्याची चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. राणेंची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते या करता त्यांना दिल्लीचे निमंत्रण आल्याचे सांगितले जात आहे.

राणे कोणाला भेटणार हे अद्याप अस्पष्ट

नारायण राणे तातडीने  दिल्लीकडे रवाना
नारायण राणे तातडीने दिल्लीकडे रवाना
राणे हे कोणाला भेटणार, हे अद्याप कळाले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विस्ताराविषयी चर्चा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मंत्रीमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मोदी यांना गेल्या दहा दिवसांत दोन वेळा भेटले आहेत. तसेच इतर राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते यांच्याशीही मोदींनी चर्चा केल्याचे समजते आहे. त्यातून काही नावांविषयी आडाखे बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात राणेंचे नाव आघाडीवर आहे. मात्र मोदी हे अनेकदा धक्कातंत्र अवलंबत असतात. त्यामुळे माध्यमांतून चर्चिली जाणारी नावे त्यांच्या यादीत हमखास नसतात. असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे राणे यांच्या नवीन राजकीय इनिंगचे काय होणार? याची उत्सुकता आहे.केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यताराजकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार माजी मुख्यमंत्री असलेल्या राणे यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, असे संकेत होते. मात्र अद्याप याला मूर्तरूप आलेले नाही. या विस्तारात ही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा नेते म्हणूनही त्यांची राज्यात ओळख आहे. मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाचा विचार करता त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात आता टोकाचा विरोध निर्माण झाला आहे. अशावेळी शिवसेनेशी थेट पंगा घेण्याचे काम राणे करत आले आहेत. राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय विरोध सर्वांसमोर उघड आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का ? राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट मंत्री, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंत देखील कॅबिनेट मंत्री होते. परंतू राज्यातील सत्तांतराच्या धक्कादायक नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते. राणेंना राज्यात फडणवीसांच्या मंत्रीमंडळात घेण्यात शिवसेनेचा आधीच्या भाजपा-शिवसेना युती सरकारमध्ये प्रचंड विरोध होता. एवढेच नाही तर राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यालाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊ शकले नव्हते. राणेंना राज्याच्या मंत्रीमंडळात न घेण्याच्या शिवसेनेच्या अटीमुळे त्यांना राज्यसभेत पाठविण्यात आले होते. तेथेही त्यांना फारशी संधी मिळाली नाही. मात्र आता संधी मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा- भाजपपेक्षा दुप्पट वेगाने राष्ट्रवादीचा विस्तार करेन, प्रवेशानंतर खडसेंचा शब्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.