सिंधुदुर्ग - कोकण रेल्वे मार्गावर पेडणे (गोवा) बोगद्यात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. या वर्षीच्या पावसाळ्यातील कोकण रेल्वेला बसलेला पहिला आणि मोठा धक्का मानला जातो. रेल्वे प्रशासन दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर करत आहे. या मार्गावरील गाड्या मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत.
पेडणे (गोवा) बोगद्यात दरड कोसळल्याने एर्नाकुलम निजामुद्दीम सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, थिरुवंतनपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस, निजामुद्दीम एर्नाकुलम एक्सप्रेस व लोकमान्य टिळक थिरुवंतनपुरम सेंट्रल एक्सप्रेस या गाड्या पनवेल- पुणे- मिरज- लोंढामार्गे मडगाव अशा वळवण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पेडणे बोगद्यात दरड हटविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे.
कोकणात गणपतीसाठी रेल्वेने सिंधुदुर्गात उतरणार्या प्रवाशांना मडगाव स्टेशनवर उतरविण्यात येणार असल्याने गोवा बॉर्डर चेकपोस्टवरुन येताना अडचणी निर्माण होणार आहेत.