सिंधुदुर्ग - नेहमीच अभिनव उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण पंचायत समितीने रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने पर्यावरण समृद्ध करण्याच्या उद्देशाने कोकम बी राखी हा उपक्रम राबवला आहे. पर्यावरण पूरक असलेल्या या उपक्रमाची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.
कोकमच्या बिया असलेल्या राख्या पंचायत समिती महिला कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. भाऊबीजेला बांधलेली राखी तुटते, अथवा काही दिवसांनी आपण काढून टाकतो. मात्र, कोकम बी चिकटवलेली राखी आजूबाजूच्या परिसरात टाकल्यास अथवा योग्य जागी पुरून ठेवल्यास कोकम झाडे परिसरात उगवणार आहेत. सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. निसर्गाचा समतोल हा सर्वात महत्त्वाचा आहे. निसर्ग वाचला तर आपण सर्वजण वाचणार आहोत. याच हेतूने निसर्ग समृद्ध व्हावा, झाडे वाढावीत या उद्देशाने कोकम बी राखी ही संकल्पना राबवली जात असल्याचे सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी सांगितले.
![Kokam seed Rakhi initiative of Malvan Panchayat Samiti in sindhudurag](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sindhudurg-4-kokam-seed-rakhi-initiative-of-malvan-panchayat-samiti-10022_02082020113445_0208f_1596348285_43.jpeg)
![Kokam seed Rakhi initiative of Malvan Panchayat Samiti in sindhudurag](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sindhudurg-4-kokam-seed-rakhi-initiative-of-malvan-panchayat-samiti-10022_02082020113445_0208f_1596348285_730.jpeg)