ETV Bharat / state

सिंधुदुर्गात कारच्या धडकेत दोन वृद्ध पादचारी गंभीर जखमी

author img

By

Published : Feb 14, 2021, 2:03 AM IST

पुण्याहून तारकर्लीच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारची जोरदार धडक बसून दोन वृद्ध पादचारी गंभीर जखमी झाले. कणकवली प्रांताधिकारी कार्यालायानजिक राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला.

Car
कार

सिंधुदुर्ग - पुण्याहून तारकर्लीच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारने दोन वृद्ध पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत दोन्ही वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत. कणकवली प्रांताधिकारी कार्यालायानजिक राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. या अपघाताचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. अपघातानंतर कारचालकाने अपघात स्थळावरून कारसह पळ काढला होता. नरडवे फाट्यावर पोलिसांच्या दंगा काबू पथकाकडे जाऊन करचालक थांबला.

घटनेचे दृष्य

हेही वाचा - सिंधुदुर्गात निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत धुमशान सुरूच,कडक पोलीस बंदोबस्त असताना जाळले पुतळे

लातूरमधील दोन युवक आपल्या दोन मैत्रिणींसह पर्यटनासाठी पुण्याहून भाड्याची कार घेऊन तारकर्लीला निघाले होते. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरून चालणाऱ्या दोन वयोवृद्धांना धडकली. दोन्ही वृद्ध जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते.

पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी उपनिरीक्षक जगदीश बांगर, एपीएसआय विनायक चव्हाण, चालक एपीएसआय राजू उबाळे यांच्यासह तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली व जखमी वृद्धांना रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर, कारचालकासह सहकारी पर्यटकांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हेही वाचा - निलेश राणे आणि विनायक राऊत यांच्यात टोकाचा वाद, सिंधुदुर्गात कडक पोलीस बंदोबस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.