सिंधुदुर्ग - शिरोडा बाजारपेठेतील व्यापारी न्हावेलकर यांच्या घराला भीषण आग लागली. आगीत घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याने सातजण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
हेही वाचा- औसातून मुख्यमंत्र्यांचे पीए तर निलंग्यामध्ये पुन्हा काका-पुतण्यात लढाई
दरम्यान, आगीच्या घटनेनंतर जखमींना अधिक उपचारासाठी नजीकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत घराचे व बाजूला असलेल्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वेंगुर्लेसह शिरोडा ग्रामपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे आग विझवताना मोठी कसरत करावी लागली. ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.