ETV Bharat / state

'नीट परीक्षेसाठी गोवा सेंटर निवडलेल्या 'या' विद्यार्थ्यांची व्यवस्था करा' - Sindhudurg NEET students

गोवा सेंटर निवडलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी मधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश मिळावा किंवा या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये परीक्षेच्या केंद्राची निर्मिती करावी. जेणेकरून या विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होईल, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे

नीट परीक्षेसाठी गोवा सेंटर निवडलेल्या 'या' विद्यार्थ्यांची व्यवस्था करा

author img

By

Published : Aug 20, 2020, 3:05 PM IST

सिंधुदुर्ग - मानव संसाधन विकास मंत्रालयाने राज्यांच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचे आयोजन केले आहे. गोवा सेंटर निवडलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी मधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश मिळावा, किंवा या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये परीक्षेच्या केंद्राची निर्मिती करावी. जेणेकरून या विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होईल, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक यांच्याकडे केली आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरीतून या परीक्षेला ८०० विद्यार्थी बसत आहेत.

मानव संसाधन विकास मंत्रालयाने राज्यांच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचे आयोजन केले आहे.त्यानुसार भारतभरातील १५५ शहरातील केंद्रांची ही परीक्षा घेण्यासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून सुमारे ३५ हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३०० आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ५०० विद्यार्थी परीक्षेला बसत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दुर्गम व डोंगराळ जिल्हे आहेत. याठिकाणी कनेक्टिव्हिटीच्या समस्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र म्हणून गोव्याची निवड केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने गोव्यात येणाऱ्या व्यक्तींसाठी स्वॅब चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नीट परीक्षा देण्यासाठी समस्या निर्माण होत आहे. तरी सिंधुदुर्ग व रत्नागिरी मधील विद्यार्थ्यांसाठी स्वॅब चाचणीत शिथिलता आणावी व त्यांना परवानगी द्यावी. गोव्यात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश मिळावा किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये परीक्षेच्या केंद्राची निर्मिती करावी.जेणेकरून विध्यार्थ्यांसाठी सोयीचे होईल अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उत्तर प्रदेश नोएडा येथील नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांना केली आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनीही यासाठी ना. उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. गोवा केंद्रावर विद्यार्थ्यांची सोय झाली, तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न सुटणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.