सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सलग पाच दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. रविवारी पुन्हा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील ओरोस, कसाल परिसर जलमय झाला होता. कसाल बाजरपेठेत पाणी घुसले होते. तसेच बसस्थानकाचा भागही जलमय झाला होता.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्यानेही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याठिकाणी सलग पाच दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. रविवारीदेखील मुसळधार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली.
मुंबई-गोवा महामार्गचे काम करताना टाकलेल्या भरावामुळे ओरोस जैतापकर कॉलनीमध्ये पुन्हा एकदा पाणी साचले. यामुळे सर्व्हिस रोडवर पंज आले होते. महामार्गाच्या कामामुळे कसाल बाजारपेठेतही पाणी घुसले. तर मागील 24 तासांत मालवण तालुक्यात सर्वाधिक 130 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी 70.800 मि.मी. पाऊस झाला. आतापर्यंत एकूण सरासरी 2415.800 मि.मी. पावसाची नोंद झाली.
- तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढील -
तालुके | रविवारी झालेला पाऊस (मिमीत) | आतापर्यंत झालेला पाऊस (मिमीत) |
दोडामार्ग | 44 | 2200 |
सावंतवाडी | 61 | 2573 |
वेंगुर्ला | 110.40 | 2439.40 |
कुडाळ | 52 | 52 |
मालवण | 130 | 130 |
कणकवली | 60 | 60 |
देवगड | 70 | 2227 |
वैभववाडी | 39 | 2053 |