ETV Bharat / state

सिंधुदुर्गमध्ये १२ लाख ९७ हजार रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू जप्त - गोवा निर्मित अवैध दारू सिंधुदुर्ग

चालकाने भरधाव वेगाने टेम्पोला कणकवलीच्या दिशेने नेले. यामुळे पोलिसांचा संशय आणखीन बळावला. लागलीच पोलिसांनी टेम्पोचा सिनेस्टाईल पाठलाग करत कणकवली नरडवे चौक येथे पोलीस व्हॅन टेम्पोच्या आडवी घातली व आयशर टेम्पोला अडवले. त्यानंतर चालकासह टेम्पोला ताब्यात घेतले.

गोवा बनावटीची अवैध दारू जप्त
गोवा बनावटीची अवैध दारू जप्त
author img

By

Published : Oct 19, 2020, 9:01 PM IST

सिंधुदुर्ग- बनाव रचून ​गोव्याहून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पोतून सुरू असलेली गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक सिंधुदुर्ग पोलिसांनी उघड केली आहे. यात सुमारे १२ लाख ९७ हजार ५६० रुपयांची दारू व आयशर टेम्पो मिळून २२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून आयशर टेम्पोतून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथे महामार्गावर सापळा रचला होता. टेम्पो महामार्गावरून जात असताना पोलिसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने भरधाव वेगाने टेम्पोला कणकवलीच्या दिशेने नेले. यामुळे पोलिसांचा संशय आणखीन बळावला. लागलीच पोलिसांनी टेम्पोचा सिनेस्टाईल पाठलाग करत कणकवली नरडवे चौक येथे पोलीस व्हॅन टेम्पोच्या आडवी घातली व आयशर टेम्पोला अडवले. त्यानंतर चालकासह टेम्पोला ताब्यात घेतले.

टेम्पोच्या मागील बंद भागात कंपनीचे सील असते, त्याप्रमाणे सील असण्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी चतुराईने टेम्पो चालकाचा बनाव उघड करत बनावट दारूचा पर्दाफाश केला. या कारवाईत कणकवलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, उपनिरीक्षक प्रकाश कदम, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार अनमोल रावराणे, हवालदार रुपेश गुरव आदी सहभागी झाले होते.

गोवा बनावटीच्या दारूची कोकण मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. विशेष म्हणजे, आंतरराज्य रॅकेट या व्यवसायात सामील आहेत. वेळोवेळी पोलिसांनी या व्यवसायाला चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, प्रत्येकवेळी नव्या कल्पना लढवत ही वाहतूक केली जात आहे. आता तर कंपनी सील असल्याचे भासवून टेम्पोतून वाहतूक केली जात असल्याचा नवा फंडा पोलिसांच्या लक्षात आला आहे.

हेही वाचा- फळपीक विमा योजनेचे निकष बदलण्यासाठी राज्यस्तरावर बैठकीचे आयोजन - उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.