ETV Bharat / state

गोव्यात शुक्रवारी कोरोनामुळे 61 जणांचा मृत्यू, मृतांचा एकूण आकडा १,९९८ वर - 61 People Died in Goa Due to corona

गोव्यात शुक्रवारी आणखी ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या दोन हजारांजवळ पोहोचली आहे. तर शुक्रवारी २,४५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, २,९६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १,९९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

गोव्यात शुक्रवारी कोरोनामुळे 61 जणांचा मृत्यू

author img

By

Published : May 15, 2021, 4:00 PM IST

सिंधुदुर्ग - गोव्यात शुक्रवारी आणखी ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या दोन हजारांजवळ पोहोचली आहे. तर शुक्रवारी २,४५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, २,९६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १,९९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

गोव्यातील कोरोना स्थिती

कोविड मृतांचा आकडा कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध मार्गांनी प्रयत्न करत आहे. तरीही दररोजचा मृतांचा आकडा अजूनही ६० पेक्षा अधिकच आहे. १ ते १४ मे या कालावधीत तब्बल ८१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १,९९८ जणांचा मृत्यू झाला आहे. गोव्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही १,३२,५८५ वर पोहोचली असून, आतापर्यंत ९८,२०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ३२,३८७ सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली

गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, कोरोनामुक्तांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही प्रमाणात राज्याला दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी मडगावात सर्वाधिक २,५२३ कोरोनाबाधित आढळून आले, त्या खोलोखाल कांदोळीत १,८८७, पणजीत १,८४८, फोंड्यात १,७८५, पर्वरीत १,६३५, म्हापशात १,४४४, साखळीत १,३९३, कुठ्ठाळीत १,३१४, पेडण्यात १,३४७, चिंबलमध्ये १,२७८, तर शिवोलीत १,२८८ कोरोनाबाधितांची नोंद झाली.

हेही वाचा - प्रेमविवाह केल्याने तरुणीसमोर नवऱ्याचा डोक्यात घातली फरशी, व्हिडिओ झाला व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.