ETV Bharat / state

Sindhudurg Fish : तब्बल तीन वर्षांनी मालवणमध्ये रापणीला सापडली बंपर मासळी - मच्छिमार

जिल्ह्यातील मालवण भागातील पारंपारिक मच्छिमारांना रापणीला बंपर मासळी (found bumper fish) सापडली आहे. तारले आणि बांगडा अगदी पहिल्याच हंगामात मिळाल्याने मच्छिमार बांधवांच्या (Fisherman) आशा आता पल्लवित झाल्या आहेत.

Sindhudurg
तब्बल तीन वर्षांनी मालवणमध्ये रापणीला सापडली बंपर मासळी
author img

By

Published : Nov 22, 2022, 3:44 PM IST

सिंधुदुर्ग: यांत्रिक मासेमारीच्या आक्रमणामुळे आणि हवामानातील बदलांमुळे विस्कळीत झालेल्या पारंपारिक मासेमारीच्या सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात मासळी मिळणे हि अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने या मिळालेल्या बंपर मासळीमुळे मच्छिमार (Fisherman) आनंदित झाले आहेत. मालवणमधील वयरी समुद्रकिनारी मच्छिमार समुदायाने त्यांच्या पारंपरिक जाळ्यात तारली आणि बांगडा मासे (found bumper fish) पकडले. मोठ्या कालावधीनंतर मिळालेली मासळी पाहून आनंदाने आश्चर्यचकित झाले.

तब्बल तीन वर्षांनी मालवणमध्ये रापणीला सापडली बंपर मासळी

दुर्मिळ घटना- आम्ही आज किमान १३ ते १५ टन मासे पकडण्यात यशस्वी झालो आहोत. पण हि दुर्मिळ घटनांपैकी एक दुर्मिळ घटना आहे. जवळपास तीन वर्षांच्या कालावधीनंतर ही बंपर मासळी मिळाल्याने आम्ही सर्वच आनंदी आहोत, असे सिंधुदुर्ग जिल्हा रापण संघटनेचे (Sindhudurg District Rapan Association) सचिव दिलीप घारे यांनी सांगितले. घारे म्हणाले की, महाराष्ट्रातील एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०८ रापण असोसिएशन असून या माध्यमातून २७,००० कुटुंबे आपले पोट भरत आहेत.

सिंधुदुर्गच्या किनारी पट्ट्यात पारंपारिक मासेमारी व्यवसाय हळूहळू कमी होत असताना, बेरोजगार असलेल्या अनेकांसाठी हाच व्यवसाय आशेचा किरण बनला आहे.
नारायण जगन्नाथ मयेकर हे ७० वर्षांचे आहेत. त्यांनी वरळी, मुंबई येथील बसंत कुमार बिर्ला समूहाच्या १०९ वर्षीय जुन्या सेंचुरी मिल मध्ये काम केले. हि मिल जवळपास दशकभरापूर्वी बंद पडल्यापासून ते बेरोजगार आहेत. यानंतर मयेकर त्यांच्या मालवण या गावी परतले. ते बेरोजगार होते पण त्यांना पारंपरिक मासेमारीच्या रूपात रोजगार मिळाला. आता ते त्यांच्या वायरी गावातील रापण संघात सामील झाले आहेत. या ठिकाणाहून ते आपला रोजगार मिळवत आहेत.

या ठिकाणी भेटलेला मच्छिमार रूपेश तळवणेकर हा देखील पदवीधर तरुण आहे. पण त्याला त्याच्या उत्पन्नाचा स्रोत पारंपारिक मासेमारीतून सापडला. रुपर्स म्हणाला की, पारंपारिक मासेमारीत गुंतलेले २० टक्के मनुष्यबळ हे शिक्षित असले तरी ते बेरोजगार असल्याने हा व्यवसाय निवडत आहेत. तो पुढे म्हणतो कि, तुम्ही या उपक्रमात सहभागी असाल तर तुम्ही दरमहा सुमारे १५ ते २० हजार रुपये कमवू शकता.

दरम्यान मालवण येथील मासळी स्थानिक बाजारपेठेत विकली जाते. परंतु, त्यातील बहुतांश मासळी बेंगळुरू, हुबळी आणि गोवा यांसारख्या ठिकाणी पाठवली जाते. जिथे घाऊक विक्रेते त्याचा साठा करतात आणि नंतर देशाबाहेर निर्यात करतात. अशी माहिती यावेळी मच्छिमार बांधवानी दिली. गेल्या तीन वर्षांच्या काळात मच्छिमार बांधवाना अनेक संकटाना तोंड द्यावे लागले. कोरोना काळात फारच वाईट अवस्था आली होती. आता कुठे दिवस पालटू लागले आहेत. यावर्षीच्या पहिल्याच हंगामात मिळालेल्या चांगल्या मासळीने मच्छिमारीचा श्री गणेशा जोरात झाला आहे. मात्र, सार काही निसर्गाच्या हातात हे सांगायला हे मच्छिमार बांधव विसरले नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.