ETV Bharat / state

Adali MIDC : भाजपा सरकारला घरचा आहेर, 'या' माजी आमदाराचा सरकार विरोधातील लाँग मार्चला पाठिंबा

author img

By

Published : Aug 18, 2023, 6:27 PM IST

आडाळी ‘एमआयडीसी’ (Adali MIDC) औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना भूखंड वाटप न केल्यामुळे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारच्या विरोधात आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा लाँग मार्च काढण्यात येणार (Long march from Adali to Banda) आहे. या लाँग मार्चला भाजपासह ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे.

Adali MIDC
Adali MIDC

सिंधुदुर्ग : भाजपाचे माजी आमदार राजन तेली (Former MLA Rajan Teli) यांनी भाजपा सरकारला घरचा आहेर दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात आडाळी एमआयडीसीची (Adali MIDC) स्थापना होऊन दहा वर्षे झाली. मात्र तेथे रोजगार निर्माण होत नसल्याने आडाळी येथील नागरिकांनी 20 ऑगस्ट रोजी लाँग मार्च आयोजित केला (Long march from Adali to Banda) आहे. या लाँग मार्चला भाजपासह उबाठा ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने पाठिंबा देणार (BJP support for Adali Long March) असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

लाँग मार्च भाजपाचा पाठिंबा : याबाबत भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांची अनेकदा भेट घेऊनही एमआयडीसीमध्ये उद्योजकांना जागा देण्यात आली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. म्हणून आडाळी येथील नागरिकांद्वारे 20 ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या लाँग मार्चला भाजपाचा पाठिंबा आहे.

डबल इंजिन सरकारचं अपयश : दुसरीकडे उबाठा गटाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत महायुती सरकारवर टीका केली आहे. उद्योजकांना जमीन उपलब्ध न करुन देणं हे डबल इंजिन सरकारचं अपयश असून भाजपाच विरोधी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचा हल्लाबोल आमदार नाईक यांनी केला आहे.

आठ किलोमीटरचा लाँग मार्च : आडाळी 'एमआयडीसी' औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना भूखंड वाटप करण्यात राज्य सरकारकडून दिरंगाई केल्याच्या निषेधार्थ 20 ऑगस्ट रोजी आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीच्या वतीने हा लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची महिती समितीच्यावतीने सरपंच पराग गावकर यांनी दिली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 2013 मध्ये आडाळी येथे 720 एकर क्षेत्रावर औद्योगिक झोन मंजूर केला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी वर्षभरात त्यांच्या जमिनी सरकारकडे हस्तांतरित केल्या होत्या. मात्र महामंडळ, शासन, लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड उद्योजकांना देण्यात आले नाहीत. त्यामुळे आडाळी स्थानिक औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीच्यावतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तरी देखील प्रशासनाने लक्ष न दिल्याने या लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.