सिंधुदुर्ग - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला सातारा जिल्ह्यातील लोणंदचे एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निसर्ग पूरक रंगाच्या साहायाने मालवण दांडी बीच समुद्रात 400 फुट लांब तिरंगा साकारून अनोखी सलामी दिली आहे.
हेही वाचा - तिलारीचा कालवा फुटल्याने खळबळ, गोव्याचा पाणीपुरवठा बंद
अनोख्या पद्धतीने देशाला दिली सलामी
साताऱ्यातील लोणंद गावचे सुपुत्र एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी २६ जानेवारीचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवणच्या दांडी बीचच्या समुद्रात मध्यभागी जाऊन तीन बोटीच्या मदतीने 400 फुट लांब तिरंगा बनवला. हा तिरंगा निसर्ग पुरक खान्याचे कलर आणि मत्स्य खाद्य वापरून तयार करण्यात आला आहे. ज्या पद्धतीने वायुसेनेचे जवान हवेत विमानाच्या मदतीने धुर सोडून तिरंगा निर्माण करून सलामी देतात, त्याच पद्धतीची सलामी या अवलियांनी समुद्रातील पाण्यामध्ये दिली.
पाण्यात तिरंगा फडकवण्याची पहिलीच वेळ
हा उपक्रम राबवताना पूर्णतः खाण्याचे कलर वापरल्याचे परदेशी यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने सलामी द्यायचा आमचा मानस होता. मात्र, ही सलामी पर्यावरण पूरक असावी, असे आम्ही ठरवले होते. त्यामुळे, आम्ही खाण्याचे कलर आणि माशांचे खाद्य वापरून पाण्यावर हा तिरंगा तयार केला असल्याची माहिती मालवण येथील रश्मीन रोगे यांनी दिली.
हेही वाचा - सिंधुदुर्गात बाळासाहेब ठाकरेंना आगळ्या-वेगळ्या कलाकृतीतून मानवंदना