ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या वॉटर एटीएम प्रकल्पाचे लोकार्पण

author img

By

Published : Oct 8, 2020, 5:26 PM IST

वेंगुर्ले शहरात ग्रामिण भागातून येणाऱ्या लोकांना, शहरातील नागरिकांना तसेच विशेषत: पर्यटकांना स्वच्छ पिण्याचे पाणी विनासायास व अल्प किंमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी नगरपरिषदेने वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या वॉटर एटीएम सुविधेचा शुभारंभ मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.

first-water-atm-start-in-vengurle-city-in-sindudurga
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या वॉटर एटीएम प्रकल्पाचे लोकार्पण

सिंधुदुर्ग - वेंगुर्ले शहरात येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे, यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेने नाविण्यपुर्ण योजनेतून शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिन बसविली आहेत. वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करुन देणारी वेंगुर्ले नगरपरिषद ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच नगरपरिषद आहे. या वॉटर एटीएम सुविधेचा शुभारंभ मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.

वेंगुर्ले शहरात ग्रामिण भागातून येणाऱ्या लोकांना, शहरातील नागरिकांना तसेच विशेषत: पर्यटकांना स्वच्छ पिण्याचे पाणी विनासायास व अल्प किंमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी नगरपरिषदेने कौन्सिल सभेत वेंगुर्ले बंदर, दाभोली नाका, रामेश्वर मंदिर, हॉस्पिटल नाका व नगर परिषद इमारत अशा पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिन सुविधा उभारण्यासंदर्भात ठराव करुन हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी त्यासाठी नाविण्यपुर्ण योजनेतून ३० लाख रुपये निधी मंजूर केला होता.

या निधीतून शहरात पाच ठिकाणी ही वॉटर एटीएम मशिन बसविण्यात आली आहेत. आज बाजारात वीस रुपये प्रति लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा दर आहे; मात्र हे साधे पाणी एक रुपये प्रति लिटर व थंड पाणी एक रुपये प्रति अर्धा लिटर असे माफक दर नगरपरिषदेने ठेवले आहेत.

या मशिनचे उद्घाटन मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उप नगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, विधाता सावंत, प्रशांत आपटे, प्रकाश डिचोलकर, धर्मराज कांबळी, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, अधिक्षक संगिता कुबल, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या वॉटर एटीएम मशिनसाठी दिपक केसरकर यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नगराध्यक्ष गिरप यांनी केसरकर यांचे आभार व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.