सिंधुदुर्ग - जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम असून, कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे काही करू नये, असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. मुंबईसह मोठ्या सहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमनी कोकणात दाखल झाले आहेत. मात्र त्यांना थेट घरी प्रवेश न देता त्यांना अलगीकरणात ठेवण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांनी जनतेशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. यात त्यांनी येणारे चाकरमानी आपलेच आहेत. त्यांना आपण अलगीकरनात ठेऊन नंतरच गावात पाठवत आहोत, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.