ETV Bharat / state

सिंधुदुर्ग कासार्डेमधील अकरावीचा विद्यार्थी दिग्विजय जाधवने शोधले कॅश सॅनिटायझर यंत्र - सिंधुदुर्ग कॅश सॅनिटायझर शोध

खरेदी विक्रीत होणाऱ्या नोटांच्या आणि नाण्यांच्या देवाण-घेवाणीतून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नोटा सॅनिटाईझ करणे दुकानदारांसाठी जिकरीचे काम झाले आहे. यावर उपाय म्हणून कासार्डे गावातील दिग्विजय मुकुंद जाधव या अकरावीच्या विद्यार्थ्यांने कॅश सॅनिटायझर यंत्रणा बनवली आहे.

Cash Sanitizer
कॅश सॅनिटायझर
author img

By

Published : Aug 27, 2020, 12:21 PM IST

सिंधुदुर्ग - कोरोना प्रसार रोखण्यासाठी सतत हात धुणे, हाताला सॅनिटायझर लावणे, मास्क लावणे, असे अनेक उपाय सध्या केले जात आहेत. असे असतानाही खरेदी विक्रीत होणाऱ्या नोटांच्या आणि नाण्यांच्या देवाण-घेवाणीतून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नोटा सॅनिटाईझ करणे दुकानदारांसाठी जिकरीचे काम झाले आहे. यावर कासार्डे गावातील दिग्विजय मुकुंद जाधव या अकरावीच्या विद्यार्थ्यांने भन्नाट उपाय शोधला आहे. त्याने कोरोना बरोबरच इतरही विषाणूंचा नायनाट करणारे 'कॅश सॅनिटायझर' यंत्र बनवले आहे. अल्ट्राव्हायलेट लाईटचा वापरकरून त्याने हे कॅश सॅनिटायझर बनवले आहे. ही खास लाईट त्याने सर्व सिस्टिमसह कॅश ड्रॉवरला बसवली व त्याचा प्रकाश फक्त कॅशवरच पडेल अशी रचना केली आहे.

दिग्विजय जाधव हा कासार्डे माध्यमिक विद्यालयातून ९८.८० गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याचा जिल्ह्यात पाचवा व राज्यात सातवा क्रमांक आला आहे. दिग्विजयने अतिशय उपयुक्त असे यंत्र बनवले असून त्यामुळे ड्रॉवर उघडताच सर्व कॅश सहज सॅनिटाईज होत आहे. हे यंत्र सध्या त्याच्या वडिलांच्या 'मारूती मेडिकल स्टोअर'मध्ये प्रत्यक्षात कायर्रत आहे.

कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एम. इंगवले यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरणे तसेच काउंटर निर्जंतुक करणे याविषयी मेडिकल स्टोअरमध्ये येऊन दिग्विजयच्या वडिलांना काही सूचना दिल्या होत्या. सोबतच कॅश निर्जंतुक करण्यासाठी काही करता येईल का? अशी विचारणाही केली होती.

त्यानंतर मुकुंद जाधव यांनी आपला मुलगा दिग्विजय बरोबर चर्चा केली. अल्ट्राव्हायलेट लाईटचा वापर करून कॅश सॅनिटायझरची निर्मिती करण्याची कल्पना दिग्विजयने समोर आणली. एक छोटसे यंत्र बनवण्यासाठी त्याने साहित्याची जुळणी सुरू केली. साधारणपणे मार्केटमध्ये निळा लाईट हाच अल्ट्राव्हायलेट लाईट म्हणून खपवला जातो. मात्र, फक्त निळ्या लाईटमुळे नोटांवरील विषाणू मारले जात नाहीत, असे कासार्डे हायस्कूलमध्ये विज्ञान विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या दिग्विजयच्या आई सविता जाधव यांनी त्याला सांगितले. त्याने खऱ्या अल्ट्राव्हायलेट लाईटचा शोध घेतला असता समजले की, आरओ वॉटर फिल्टरमध्ये वापरली जाणारी यूव्ही ट्यूब ही खरी अल्ट्राव्हायलेट असते. जीवाणू, विषाणूंचा ती १०० टक्के नाश करते. ही ट्यूब सर्व सिस्टिमसह कॅश ड्रॉवरला बसवली व त्याचा प्रकाश फक्त कॅशवरच पडेल, अशी रचना करून घेत हे यंत्र अखेर दिग्विजयने कार्यान्वित केले. ड्रॉवर बंद केल्यानंतर युव्ही लाईट सुरू होणार आणि ड्रॉवर उघडल्यानंतर युव्ही लाईट बंद होणार, अशी स्वयंचलित यंत्रणा त्याने केली आहे. ही संपूर्ण यंत्रणा बनवण्यासाठी त्याला फक्त ८५० रुपये इतका खर्च आला आहे.

दिग्विजय जाधव हा लहानपणापासून आपल्या आईवडिलांच्या मदतीने सतत काहीनाकाही नवनिर्मिती करण्यात मग्न असतो. त्याने बनवलेले विशेष मॉडेल कार्बन कंट्रोल मशीन, डाटा ट्रान्सफर थ्रोज साऊंड, लाईफ सेव्हर जॅकेट, इको फ्रेंडली इलेक्ट्रिसिटी प्रॉडक्ट, फ्यूचर रेल्वे सर्विस त्याने बनवली असून घरीतील वेगवेगळ्या लाईटही टायमर लाऊन स्वयंचलित केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.