सिंधुदुर्ग - श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरे भक्तांनी गजबजून गेली होती. अगदी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत रामेश्वर, कुणकेश्वर, कलेश्वर आणि हिरण्यकेशी आदि मंदिरात भक्तांची रेलचेल पाहायला मिळाली.
हेही वाचा - अकोल्यात सोमवारी कावड महोत्सव; कावडधारी निघाले पूर्णा नदीवर
देवगडमधील श्री क्षेत्र कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी कुणकेश्वर मंदिरात सकाळपासूनच गर्दी केली. त्यामुळे भक्तिमय वातावरणात कुणकेश्वर नगरी दुमदुमून गेली होती. श्रावणातील पहिल्या ते शेवटच्या सोमवारपर्यंत आवर्जून भाविक कुणकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. जिल्ह्यातील इतर प्रसिद्ध मंदिरात देखील श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी गर्दी केली. शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने ठिकठिकाणी भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.