सिंधुदुर्ग: दगडाला पाझर फुटत नव्हता, म्हणूनच 50 आमदार बाहेर पडले 50 MLAs walked out असल्याचे विधान करत राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्ष नेतृत्वावर बोलताना मनाला वेदना होत आहेत, असे सांगताना त्यांनी दगडाला पाजर फुटला नाही, म्हणूनच 50 आमदार फुटले असल्याचे विधान केले आहे.
दगडाला पाझर फुटत नव्हता: त्यांना त्यावेळी पाजर फुटला असता, साध्या भेटी तरी दिल्या असत्या, जनतेची गाऱ्हाणी समजून घेतली असती. तर पक्षामध्ये बंड का झालं असतं ? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ज्यावेळी 20 आमदार आले आणि हे सर्व मिटवूया, सर्वांनी एकत्र येऊया असे सांगत असताना कोण सांगत होतं. तुम्हीही त्यांच्याबरोबर निघून जा ? त्यावेळी पाझर का नाही फुटला ? असाही प्रश्न शिक्षण मंत्री दीपक केसरकर Education Minister Deepak Kesarkar यांनी उपस्थित केला आहे.
केसरकरांची टीका: बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना कुठेतरी अडचणी येणार हे माहीत असूनही आमदारांना जा म्हणणं याला काय म्हणायचं ? हा देखील प्रश्न आहे. असे सांगतानाच आम्ही कुणावर टीका करत नाही. आमची दुःख आमच्या हृदयात आहेत. ते सांगून आम्हाला मत नाही मिळवायची. आमच्या कामावर आम्हाला मतं मिळवायची आहेत. ते आम्ही करून दाखवू. अडीच वर्ष तुम्हाला लोकांनी संधी दिली. आता अडीच वर्षात आम्ही काय करतो ते बघा आणि नंतर लोक काय म्हणतात ते ऐका. केवळ लोकांना भडकवल्याने सरकारं चालत नसतात, त्यांचं कल्याण होत नसते, त्यासाठी दिवस रात्र काम करावे लागते. असेही शिक्षण मंत्री दीपक केसरकर Education Minister Deepak Kesarkar यांनी यावेळी सांगितले आहे.