ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाचा काँग्रेसकडून निषेध, मुख्यमंत्री निवासस्थानावर काढला मोर्चा - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

बाणावली येथे दोन अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत बेजबाबदार वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेत रान उठवत सरकारला धारेवर धरले होते. आज राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी मोर्चा काढून पुन्हा एकदा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुख्यमंत्री निवासस्थावर काढला मोर्चा
मुख्यमंत्री निवासस्थावर काढला मोर्चा
author img

By

Published : Jul 30, 2021, 9:26 PM IST

पणजी (गोवा) - बाणावली येथे दोन अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत बेजबाबदार वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेत रान उठवत सरकारला धारेवर धरले होते. आज राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी मोर्चा काढून पुन्हा एकदा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाचा काँग्रेसकडून निषेध, मुख्यमंत्री निवासस्थानावर काढला मोर्चा

पणजी-गोव्यात मागच्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. दक्षिण गोव्यातील बाणावली समुद्र किनाऱ्यावर 25 जुलै रोजी वाढदिवस साजरा करायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्याचे पडसाद गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उठले होते. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
या प्रकरणी उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पालकांना दोषी ठरवत आपल्या मुलांना रात्रीच्या वेळी बीचवर पाठवताना आपणही काळजी घ्यायला हवी प्रत्येकवेळी पोलीस आणि सरकारवर अवलंबून राहू नये, असे खळबळजनक विधान केले होते. त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

काँग्रेसकडून मुख्यमंत्रांच्या घरासमोर मोर्चा
दरम्यान, राज्यातील विरोधीपक्ष काँग्रेसने शुक्रवारी मुख्यमंत्रांच्या पणजी अलतींनो येथील घरासमोर मोर्चा काढून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी गोवा महिला काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दरम्यान, या आंदोलनादरम्यान आंदोलक व पोलिसांत शाब्दिक चकमक झाली असून पोलिसांनी आंदोलकांना अटक करून दोना पावला पोलीस स्थानकात हजर नेण्यात आले.

हेही वाचा - मी पॅकेज देणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री; महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्याबाबत विचार - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.