ETV Bharat / state

सिंधुदुर्गात जिल्हा परिषद भवनासमोर भाजपाचे 'ठिय्या आंदोलन' - भाजपाचे 'ठिय्या आंदोलन'

जिल्ह्यात कोरोनाची भितीदायक परिस्थिती आणी रेड झोनमधे गेलेला जिल्हा यामुळे जिल्हातील नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. त्यातच जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ताब्यात दिलेल्या त्या बाराही रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे ‍पालकमंत्र्यांनी माघारी बोलावले. हे केवळ उद्घाटनासाठी अडवून ठेवल्याचे सांगत भाजपाने मंगळवारी (आज) जिल्हा परिषद भवनासमोर ठिय्या आंदोलन केले.

भाजपा आंदोलन
भाजपा आंदोलन
author img

By

Published : Jun 8, 2021, 8:46 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी केवळ स्वतःच्या हस्ते उद्घाटन व्हावे म्हणून जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना वितरीत केलेल्या रुग्णवाहिका मागे बोलावून घेतल्या आहेत, असा आरोप करत भाजपाने जिल्हा परिषद भवनासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाही करण्यात आले. तर पालकमंत्र्यांनी अडवून ठेवलेल्या त्या रुग्णवाहिका तत्काळ सोडा, अशी मागणीही भाजपाने यावेळी केली आहे.

जिल्हा परिषद भवनासमोर भाजपाचे 'ठिय्या आंदोलन'

'पालकमंत्र्यांनी अडवून ठेवलेल्या त्या रुग्णवाहिका तत्काळ सोडा'

जिल्ह्यात कोरोनाची भितीदायक परिस्थिती आणी रेड झोनमधे गेलेला जिल्हा यामुळे जिल्हातील नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. त्यातच जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ताब्यात दिलेल्या त्या बाराही रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे ‍पालकमंत्र्यांनी माघारी बोलावले. हे केवळ उद्घाटनासाठी अडवून ठेवल्याचे सांगत भाजपाने मंगळवारी (आज) जिल्हा परिषद भवनासमोर ठिय्या आंदोलन केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांचा निषेध करण्यात आला.

भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी सिंधुदुर्गात एकवटले

उद्घाटनाच्या श्रेयासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी आरोग्य केंद्रांच्या ताब्यात गेलेल्या रुग्णवाहिका जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत पुन्हा माघारी बोलावून घेतल्या. या रुग्णवाहिकांची गरज त्या त्या गावात असताना व कोरोनाने रुग्ण तडफडत असताना पालकमंत्र्यांची हि कृती अत्यंत संतापजनक आहे असे मत यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. जिल्हाभरातून भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी सिंधुनगरी येथे एकवटले. तत्पूर्वी राजन तेली यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाच्या या शिष्टमंडळाने जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांची भेट घेत, या रुग्णवाहिका तत्काळ त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात द्या, अशी मागणीही केली.

हेही वाचा -मराठा आरक्षणाविषयी मोदींसोबत काय झाली चर्चा, ऐका अशोक चव्हाण यांच्याकडून..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.