ETV Bharat / state

सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊतांचा पुतळा जाळला - BJP workers burnt statue of MP Vinayak Raut

भाजप नेत्यांवर टीका केल्याचा आरोप करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलानं झोडत सावंतवाडीत पुतळा जाळण्यात आला.

Sindhudurg
सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊतांचा पुतळा जाळला
author img

By

Published : Feb 12, 2021, 8:37 PM IST

सिंधुदुर्ग - माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसैनिकांनी जोडो मारो आंदोलन केल्यानंतर सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊतांचा पुतळा जाळला आहे.

सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊतांचा पुतळा जाळला

पुतळ्याला चपलाने झोडले

भाजप नेत्यांवर टीका केल्याचा आरोप करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलानं झोडत सावंतवाडीत पुतळा जाळण्यात आला. भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी पुतळ्याला जोडे हाणत शिवसेनेला जशासतसे उत्तर दिले आहे.

विनायक राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी

यावेळी खासदार विनायक राऊत व शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, पं.स. सभापती मानसी धुरी, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, युवा शहर अध्यक्ष संदेश टेमकर, बांदा सरपंच अक्रम खान, शहर अध्यक्षा मोहीनी मडगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, नेमळे सरपंच विनोद राऊळ, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, संजय नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, परिणीती वर्तक, मिसबा शेख आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.