ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत भिडले नारायण राणे आणि विनायक राऊत! - sindhudurg political news

दोडामार्गातील तिलारी धरण डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून भाजपा सदस्य राजन म्हापसेकर यांनी मांडलेल्या भूमिकेला शिवसेनेचे सदस्य बाबूराव धुरी यांनी आक्षेप घेतल्यामुळे वाद निर्माण झाला.

sindhudurg
sindhudurg
author img

By

Published : Jan 28, 2021, 4:44 PM IST

Updated : Jan 28, 2021, 4:56 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्हा नियोजन बैठकीत खासदार नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत तिलारी धरण कालवा फुटीच्या मुद्यावर एकमेकाला भिडल्याची घटना घडली आहे. दोडामार्गातील तिलारी धरण डावा कालवा फुटल्याच्या विषयावरून भाजपा सदस्य राजन म्हापसेकर यांनी मांडलेल्या भूमिकेला शिवसेनेचे सदस्य बाबूराव धुरी यांनी आक्षेप घेतल्यामुळे वाद निर्माण झाला. याच मुद्द्यावर राणे आणि राऊत यांच्यातही शाब्दिक चकमक घडली.

दोन्ही बाजूच्या सदस्यांचा सभागृहात गोंधळ

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाचा दावा कालवा अलीकडेच फुटला या बाबतचा प्रश्न भाजपा सदस्य राजन म्हापसेकर यांनी उपस्थित केला. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी उत्तर देण्यापूर्वी शिवसेना सदस्य बाबुराव धुरी बोलायला लागले. यावरून गदारोळ सुरू असताना आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याला खासदार विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला. आम्ही नारायण राणे यांचा आदर करतो, मात्र आमदार नीतेश राणे यांचे वक्तव्य योग्य नाही, असे मत राऊत यांनी व्यक्त करताच शब्दिक चकमक उडाली. यावेळी राऊत आणि राणे एकमेकाला चांगलेच भिडले. पालकमंत्री सामंत यांनी हस्तक्षेप करत या प्रश्नाबाबत स्वतंत्र बैठक बोलावली जाईल, असे सांगत सर्वाना शांत केले.

नियोजन सभेत सुचविलेली कामे बदलली जातात

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभा एक वर्षाने होत आहे, जी कामे मागच्या बैठकीत सुचवली, त्याला मंजुरी मिळाली. पण ती कामे बदलण्यात कशी आली? हे अधिकार पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना आहे का? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी व भाजपाच्या सदस्यांनी करत पालकमंत्र्यांना धारेवर धरले. नियोजन सभेत सुचविलेली कामे बदलली जातात, असा थेट आरोप यावेळी भाजपा सदस्यांनी केला.

अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना

कासार्डे, फोंडाघाट परिसरात बेकायदेशीर वाळू व्यवसाय चालतो तो तातडीने बंद करा. अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे हा वाळू व्यवसाय सुरू असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी सर्वच अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. वाळूचा दर जो दुप्पट झाला आहे तो कमी करू, असे पालकमंत्री यांनी सांगितले. तर खासदार राणे यांनी अवैध व्यवसायला पाठिंबा देणाऱ्या पुढाऱ्यांवरही कारवाई करा, असे सूचित केले.

Last Updated : Jan 28, 2021, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.