ETV Bharat / state

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोकणाला शाप लागला' - सिंधुदुर्ग मुख्यमंत्री दौरा

फयान वादळ इथे आले होते. पालकमंत्री म्हणून नारायण राणे होते. त्यांनी सगळ्याबाजूने मदत कशी पोहचविता येईल, लोकांना आर्थिक मदत कशी करता येईल ? यासाठी काम केले. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोकणाला शाप लागलेला आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले आहे.

नितेश राणे
नितेश राणे
author img

By

Published : May 22, 2021, 2:57 AM IST

Updated : May 22, 2021, 3:40 AM IST

सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा हा कोकणी माणसाची निराशा करणारा आहे. मागच्यावेळचा अनुभव पाहता या चक्रीवादळातील नुकसानीची रक्कम मिळेल याची आम्हाला खात्री वाटत नाही. बायकोने फेरफटका मारून या म्हणून सांगितल्याने मुख्यमंत्री कोकणात आले, असा टोला लगावतानाच येत्या काळात सरकारला आगामी अधिवेशनात सळो कि पळो करून सोडणार असल्याचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोकणाला शाप लागलेला आहे, असेही ते म्हणाले.

आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया

'मुख्यमंत्र्यांनी नागरिकांची निराशा केली'

मुख्यमंत्री काहीतरी घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र कोणतीही घोषणा न करता ते निघून गेले. त्यामुळे इथल्या नागरिकांची फार मोठी निराशा झाल्याचे आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. मी नुकसानग्रस्त भागामध्ये फिरतोय, लोकांचा अक्षरशः २५-३० वर्षाचा संसार उद्धवस्थ झालेला आहे. आंबा बागायतीचे नुकसान झालेले पाहता ते झाड पुन्हा उभाच राहू शकत नाही. मच्छिमारांच्या होड्यांचे नुकसान होत असेल किंबहुना त्यांची रोजी रोटीच त्याच्यावर असेल तर ते उभे कसे राहणार ? आता जी जमिनीवरची परिस्थिती आहे ही जर मुख्यमंत्र्यांना बघायचेच नसेल, नुसते फिरण्यासाठीच यायचा असेल तर मग कोकण उभा कस राहणार? असा सवालही नितेश राणे यांनी केला.

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोकणाला शाप लागलेला'

फयान वादळ इथे आले होते. पालकमंत्री म्हणून नारायण राणे होते. त्यांनी सगळ्याबाजूने मदत कशी पोहचविता येईल, लोकांना आर्थिक मदत कशी करता येईल ? यासाठी काम केले. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोकणाला शाप लागलेला आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले आहे. सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर या वादळात नुकसानभरपाई कितपत मिळेल याबाबत माझ्या मनात शंका आहे, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

'आगामी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार'

दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी इथली परिस्थिती पाहिली आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमच्या पक्षाचे सर्व आमदार अधिवेशनात या सरकारला सळो कि पळो करून सोडू. शिवसेनेने भ्रमनिरास केलेला आहे, या महाविकास आघाडीने जो काही विश्वासघात केलेला आहे, त्याचे उत्तर अधिवेशनात आम्ही सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही, असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे.

Last Updated : May 22, 2021, 3:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.