ETV Bharat / state

'पालकमंत्री उदय सामंत यांच्यात कुवत असेल तर त्यांनी निधी आणून दाखवावा'

author img

By

Published : May 20, 2021, 7:00 AM IST

गतवर्षी निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्या आठ कोटीचा पंचनाम्या पैकी केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याला 49 लाख 60 हजार रुपये मिळाले मग आता सत्ताधारी पालक मंत्री आमदार खासदार हे पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत. मग जे पंचनामे गेल्यावर्षी पंचनामे केले त्याची ती रक्कम मिळाली नाही. त्यामुळे आताचे आदेश व पंचनामे व नुकसानीचे पाहणी दौरे हे फोटोसेशन पुरतेच आहेत का? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केलाय.

bjp-mla-nitesh-rane-attacks-on-uday-samant-over-relief-fund
नितेश राणे

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनाने 8 कोटी 73 लाख रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे करून ती रक्कम शासनाकडे मागणी केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 कोटीची मदत कोकणातील शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना जाहीर केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली रक्कम मिळालीच नाही. शिवाय प्रशासनाने मागितलेली रक्कमही मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांची आणि पालकमंत्र्यांची कुवत असेल तर पंचनामे करण्यापेक्षा जिल्ह्यात निधी आणून दाखवावा, असे थेट आव्हान भाजपा आमदार नितेश राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला 49 लाख 60 हजार रुपये मिळाले-

गतवर्षी निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्या आठ कोटीचा पंचनाम्या पैकी केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याला 49 लाख 60 हजार रुपये मिळाले, मग आता सत्ताधारी पालक मंत्री आमदार खासदार हे पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत. मग जे पंचनामे गेल्यावर्षी पंचनामे केले त्याची ती रक्कम मिळाली नाही. त्यामुळे आताचे आदेश व पंचनामे व नुकसानीचे पाहणी दौरे हे फोटोसेशन पुरतेच आहेत का? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी आमदार-खासदार यांच्यासह सरकारवर टीकेची झोड उठवली. या सरकारकडून काही अपेक्षा ठेवू शकत नाही.

आमदार नितेश राणेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला समाचार..

राज्यपालांचे लक्ष वेधून न्याय मिळवून देणार -

यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असून कोकणातील नुकसानग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यपालांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. गेल्या वेळच्या निसर्गचक्रीवादळातील निकष बदलत मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीला 75 तर सिंधुदुर्गसाठी 25 कोटीची घोषणा केली. मात्र या निधीबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले असता, त्या ठिकाणी त्यांच्याकडून आलेली माहिती धक्कादायक आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी कोकण आयुक्तांकडे आठ कोटीची नुकसान भरपाई मागितली, त्याबदल्यात केवळ 49 लाख आले. मग पंचनामे करून उपयोग काय केवळ महसूल कर्मचाऱ्यांना कामाला लावायचे आणि जनतेची दिशाभूल करायची आणि हेडलाइन मिळवायचे हे चालणार नाही. ठाकरे सरकार पूर्णतः अपयशी ठरलेले आहे, असा आरोपही आमदार नितेश राणे यांनी केला.

हेही वाचा - धक्कादायक..! डॉक्टरांनी मृत रुग्णावर चक्क ४ दिवस केला उपचार, नांदेडमधील रुग्णालयातील प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.