ETV Bharat / state

'स्वतःचे रिसोर्सेस असताना केंद्राकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भीक मागायला का जातात?' - obc reservation sindhudurg bjp chakkajam andolan

हे सरकार झोपेचा सोंग करत आहे. त्यांना विषयच कळत नाही. वेगवेगळे मंत्री आपल्या मस्तीत आहेत. मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर कुठे दिसत नाहीत. तर उपमुख्यमंत्री पुण्याच्या बाहेर कुठे दिसत नाहीत. प्रत्येकाने आपापले जिल्हे हे मस्ती करण्यासाठी वाटून घेतलेले आहेत.

nilesh rane
निलेश राणे
author img

By

Published : Jun 27, 2021, 6:41 AM IST

Updated : Jun 27, 2021, 7:04 AM IST

सिंधुदुर्ग - महाराष्ट्र राज्याकडे स्वतःचे रिसोर्सेस असताना केंद्राकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भीक मागायला का जातात? या शब्दात भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साधी ग्रामपंचायत चालवायला जमलेली नाही. त्यामुळे त्यांना राज्य चालवायला रिसोर्सेस कुठून उभे करायचे हे माहित नाही? अशी टीकाही त्यांनी केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काल (शनिवारी) राज्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सिंधुदुर्गात येथील आंदोलना दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते निलेश राणे

मुख्यमंत्री मुंबईबाहेर आणि उपमुख्यमंत्री पुण्याबाहेर दिसत नाहीत -

यावेळी निलेश राणे म्हणाले, हे सरकार झोपेचा सोंग करत आहे. त्यांना विषयच कळत नाही. वेगवेगळे मंत्री आपल्या मस्तीत आहेत. मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर कुठे दिसत नाहीत. तर उपमुख्यमंत्री पुण्याच्या बाहेर कुठे दिसत नाहीत. प्रत्येकाने आपापले जिल्हे हे मस्ती करण्यासाठी वाटून घेतलेले आहेत. त्याच्या पलीकडे महाराष्ट्राचे विषय कुठचे सुटतील, अशी अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

15 महिने हे न्यायालयात पुरावे सादर करू शकले नाहीत -

15 महिने हे सरकार झोपले होते. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सरकारने जे पुरावे न्यायालयात दिले पाहिजे होते ते दिलेले नाहीत. १५ महिने न्यायालयाने वाट पहिली. इतके असूनही ठाकरे सरकार कमी पडते. याचा थेट असा अर्थ होतो कि, त्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही आणि गोंधळच घडवायचा आहे. त्यांना ना मराठा आरक्षणामध्ये रस आहे किंवा ओबीसींचे राजकीय आरक्षण आहे ते टिकविण्यामध्ये रस आहे. त्यांना फक्त रस आहे कि गोंधळ घालत बसा. म्हणजे लोक बाकीचे सगळे विषय विसरतील. कोरोनाचे भूत दाखवत रहा. म्हणजे बाकी सर्व काही विसरतील आणि त्यांना आपल्या मस्तीत पाच वर्ष काढता येतील, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा - संजय राऊत म्हणतात, 'कुणी काहीही म्हणाे, मुख्यमंत्री आमचाच'

विजय वडेट्टीवारांना काडीचीही किंमत नाही -

विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नये, असे म्हटले आहे. या विधानाचा निलेश राणे यांनी समाचार घेतला. विजय वडेट्टीवारांना मंत्रालयात नाही आणि कॅबिनेटमध्ये काडीचीही किंमत नाही नाही. विजय वडेट्टीवार आज काय म्हणतील त्याला उद्धव ठाकरे क्रॉस करतात. कॅबिनेटमध्ये बोलायची त्यांची धमक नाही. त्यांनी मीडियासमोर येऊन पोपटपंची करू नये. त्यांना ओबीसींच्या आरक्षणाचे एवढच पडले असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर यावे. यानंतर मग ठाकरे सरकारला आपला विरोध किती आहे ते दाखवावे?, अशी टीकाही त्यांनी केली.

सगळं तुमच्याकडे असताना केंद्राकडे का मागायला जाता -

कोणताही मुद्दा असो राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असे त्यांना विचारलं असता ते म्हणाले, 'उद्या आदित्य ठाकरेला मुलगी बघायची असेल तरी हे केंद्राकडे मागणी करतील. यांचे काम सुरुवातीपासून भीक मागण्याचेच आहे. महाराष्ट्र प्रगत राज्य म्हणून आपण ओळखतो. मग वेळोवेळी भीक मागायची तुम्हाला गरज काय? तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, सर्व तुमच्याकडे असताना केंद्राकडे का मागायला जाता? अजित पवार पहिल्या लॉकडाऊन दरम्यान म्हणाले, आम्हाला केंद्र सरकारकडे जायची गरज नाही. नंतर तीन वेळा भीक मागायला गेले. उद्धव ठाकरेंची आता तीच सवय आहे. उद्धव ठाकरेंना साधी ग्रामपंचायती चालवायला जमलेले नाही. म्हणून पैसे कुठून उभे करायचे? हे ठाकरे सरकारला कळतच नाही. त्यामुळे आपली झोळी भरा एवढच त्यांना समजते', अशी टीका निलेश राणे यांनी केली.

हेही वाचा - ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत नव्याने निर्बंध लागू; हॉटेल, पर्यटनासह इतरविषयी सरकारकडून स्पष्टीकरण

Last Updated : Jun 27, 2021, 7:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.