ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, भाजपच्या संजना सावंत अध्यक्षपदी - शिवसेना

भाजपसह शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र नारायण राणेंसह त्यांचे पुत्र नितेश राणेंनी जिल्ह्यात तळ ठोकत सदस्य फुटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. हा विजय भाजप नेते नारायण राणे यांच्यावरील कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठतेचा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, भाजपच्या संजना सावंत अध्यक्षपदी

author img

By

Published : Mar 24, 2021, 7:53 PM IST

Updated : Mar 24, 2021, 8:19 PM IST

सिंधुदुर्ग : नारायण राणेंचा गड मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. भाजपचा संजना सावंत 30 मतांसह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांना केवळ 19 मते मिळाल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

भाजपसह शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र नारायण राणेंसह त्यांचे पुत्र नितेश राणेंनी जिल्ह्यात तळ ठोकत सदस्य फुटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. हा विजय भाजप नेते नारायण राणे यांच्यावरील कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठतेचा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिली.

हा नारायण राणेंवरील कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठतेचा विजय

निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत तणावाचे वातावरण
सकाळच्या सत्रात दोन्ही गटातील उमेदवार आणि त्यांचे सहकारी सदस्य जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादन उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण यांच्याजवळ दोन्ही उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली. दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दोन्ही बाजूच्या सभासदांना आणि उमेदवारांना प्रत्यक्ष मतदानासाठी पाचारण करण्यात आले. या वेळी सुरुवातीला भाजपचे उमेदवार सदस्य आणि कार्यकर्ते जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. यावेळी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या दारातच अडविले आणि केवळ सदस्यांना आत प्रवेश करायला परवानगी दिली. यावरून भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतापले. यावेळी काही काळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. यानंतर काही मिनिटांतच या ठिकाणी दाखल झालेल्या शिवसेना सदस्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीवर आक्षेप घेतला. यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केले.

विजयानंतर भाजपची घोषणाबाजी
या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार संजना सावंत यांना 30 मते मिळाली. तर शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांना 19 मते मिळाली. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शनही केले. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे सदस्य निवडणूक कक्षातून बाहेर येत असताना भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही काळ वातावरण चांगले तंग झाले होते. परंतु या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भाजप कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडताच समोरून भाजप आमदार नितेश राणे आले. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वातावरण तापले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच आमदार नितेश राणे यांना उचलून घेत भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.

शिवसेनेने जिल्हा बँकेचा वापर करत या निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र खासदार नारायण राणे यांच्यावर निष्ठा असलेल्या आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या भाजपच्या सर्व सभासदांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे. हा विजय कार्यकर्त्यांच्या नारायण राणे यांच्यावरील एकनिष्ठतेचा आहे अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. शिवसेनेने कितीही प्रयत्न केले तरी नारायण राणे यांना शिवसेना आव्हान देऊ शकत नाही. हे या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे असेही ते म्हणाले. आमच्या सभासदांना फोडण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता. अखेरपर्यंत शिवसेनेचे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत आणि यापुढे देखील होणार नाहीत. जिल्हा परिषदे नंतर आत्ता जिल्हा बँकेवर भाजपाचे कमळ फुलेल असा विश्वास देखील आमदार नितेश राणे यांनी या वेळी व्यक्त केला आहे.

Last Updated : Mar 24, 2021, 8:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.