सिंधुदुर्ग - आमदार वैभव नाईक ( Thackeray Group MLA Vaibhav Naik ) यांच्यावरील एसीबी कारवाई मध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे. आमदार वैभव नाईक ( MLA Vaibhav Naik ) यांची रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ( Ratnagiri Anti-Corruption Department ) चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर या चौकशीमध्ये आता नव्याने एक ट्विस्ट आल्याने आता या कारवाईची उत्सुकता पुन्हा एकदा लागून राहिली आहे.
आमदार वैभव नाईक यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी ( Inquiry of MLA Vaibhav Naik ) करण्यात आल्यानंतर आता आमदार वैभव नाईक यांचे कणकवलीतील घर, शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज, क्रशर तसेच हळवल येथील पाईप फॅक्टरी या सर्व ठिकाणच्या बांधकामाची त्यावेळच्या दरानुसार व्हॅल्युएशन करून अहवाल सादर करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न - या सगळ्या कारवाया कुणाच्या दबावाखाली सुरू आहेत हे जनतेला माहित आहे. या दबावाला घाबरून आपण उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही असे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईकांवरील कारवाईला आता नवीन वळण लागण्याची शक्यता आहे.
उद्धवजींची साथ सोडणार नाही - आपल्यावर कुणाच्या दबावाखाली कारवाई सुरू आहे हे जनतेला माहित आहे. कितीही दबाव आला तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही असे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी म्हटले आहे. आपली वडिलोपार्जित जागा आहे. त्याच जागेत मी घर बांधलेले आहे. शिवाय माझे सर्व व्यवसाय मी गेले कित्येक वर्ष करत आहे. त्यात कुठेही लपवाछपवी केलेली नाही. त्यामुळे या कारवाईने मी घाबरत नाही. कितीही दबाव आला तरी शिवसेनेतून बाहेर पडणार नाही असेही आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले आहेत.