सिंधुदुर्ग - राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा आटपून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक ही घटना घडली. या अपघातातील तीनही वाहने ही पोलीस सिक्युरिटीची आहेत. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण येथे झाला आहे.
अपघातात कोणी जखमी झाले नाही - आदित्य हे तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा आटपून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक ही घटना घडली. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी हा अपघात झाला. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागून संबंधित गाड्या येत असताना, एका गाडीने ब्रेक मारला असता. ताफ्यातील दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकून हा अपघात झाला. या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
नियोजित दौऱ्यासाठी रत्नागिरीला रवाना - अपघातग्रस्त गाड्या या या आदित्य यांच्या ताब्यातील सिक्युरिटी साठी असलेल्या जिल्हा पोलिसांच्या होत्या. आदित्य यांच्या गाडी बरोबरच या गाड्या चालल्या होत्या. मात्र, ठाकरे यांच्या गाडीला कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. काही काळ या ठिकाणी थांबल्यानंतर आदित्य आपल्या नियोजित दौऱ्यासाठी रत्नागिरीला रवाना झाले.
हेही वाचा - Families Boycott Yavatmal : धक्कादायक! अत्याचाराला कंटाळून साठ कुटुंबाचे जंगलात वास्तव्य