सिंधुदुर्ग - जिल्ह्याने कोरोनाबाधित रुग्णांचे शतक पार केले आहे. गुरुवारी प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात नव्याने 8 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्ण संख्या 105 हा वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला, तरी आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. कोरोना तपासणीचे 4 जूनरोजी प्राप्त झालेल्या अहवालांनुसार 8 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये देवगड तालुक्यातील 3, वैभववाडी तालुक्यातील 1, कुडाळ तालुक्यातील 1, सावंतवाडी तालुक्यातील 1 व कणकवली तालुक्यातील 2 व्यक्तींचा समावेश आहे. या रुग्णांच्या संख्येसह जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 105 च्या घरात पोहोचला आहे. तर, आतापर्यंत 2 महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.