ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या 763 शाळा सुरू

author img

By

Published : Feb 4, 2021, 12:03 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात टाळेबंदीनंतर 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. पालकांच्या संमतीने सुरू होत असलेल्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व अन्य मिळून 896 शाळा आहेत. आतापर्यंत 763 शाळा सुरू झाल्या आहेत.

वर्गातील छायाचित्र
वर्गातील छायाचित्र

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात टाळेबंदीनंतर 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. पालकांच्या संमतीने सुरू होत असलेल्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व अन्य मिळून 896 शाळा आहेत. आतापर्यंत 763 शाळा सुरू झाल्या असून 16 हजार 662 विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित झाले आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.

27 शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

प्राथमिक, माध्यमिक व अन्य अशा एकूण 896 शाळा आहेत. यापैकी 763 शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमधून 34 हजार 83 विद्यार्थी असून यापैकी 16 हजार 662 विद्यार्थी हजर झाले आहेत. 3 हजार 47 शिक्षक असून 2 हजार 699 शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 27 शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या शिवाय 753 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 745 कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ज्या शिक्षकांचा तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांना शाळेत हजर करुन घेतले नाहीत.

आणखी काही शिक्षकांच्या चाचण्या होणे बाकी

शाळा सुरू झाली असून विद्यार्थीही हजर शाळेत हजेरी लावत आहेत. मात्र, आणखी काही शिक्षकांच्या कोरोना चाचण्या झालेल्या नाहीत. यामुळे त्यांना अद्याप शाळेत बोलावलेले नाही. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच शाळेत हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दोडामार्गमधील सर्व शाळा सुरू

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सर्व म्हणजेच 59 शाळा सुरू झाल्या आहेत. तर उर्वरित तालुक्यातील शंभर टक्के शाळा अद्यापही सुरू नाहीत.

हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 लाख 13 वीज ग्राहकांची 71 कोटींची थकबाकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.