ETV Bharat / state

सिंधुदुर्गात माकडतापाचे 35 रुग्ण, चौघांचा मृत्यू - सिंधुदुर्ग कोरोना अपडेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडतापाचे नव्याने 35 रुग्ण आढळले आहेत. यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तिघांचा मृत्यू गोव्यातील बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयात तर एकाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात झाला, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सावी लोके यांनी दिली.

Sindhudurg
सिंधुदुर्ग
author img

By

Published : Apr 18, 2020, 2:26 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्हा प्रशासन कोरोनाबरोबरच माकडताप रोगाचाही सामना करत आहे. परिणामी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर दुहेरी ताण आला आहे. जिल्ह्यात माकडतापाचे नव्याने 35 रुग्ण आढळले आहेत. यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तिघांचा मृत्यू गोव्यातील बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयात तर एकाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात झाला, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सावी लोके यांनी दिली.

लोके यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची बैठक झाली. या बैठकीला उन्नती धुरी, राजेश कविटकर, हरी खोबरेकर यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोनासंदर्भात बाबींचाही आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्यावतीने 6 लाख 87 हजार 679 लोकांचा सर्व्हे करण्यात आला. यातील 3 हजार 729 लोकांना सर्दी आणि खोकला ही लक्षणे आढळून आली. हे सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून बैठकीत देण्यात आली.

आत्तापर्यंत 124 रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. यातील 69 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, तर 55 रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. 144 रुग्णांचे कोरोना नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील एकच नमुना पॉझिटिव्ह आला असून 103 नमुने निगेटिव्ह आहेत. तर 40 अहवाल प्रलंबित आहेत.

संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये योग्य त्या सुविधा पुरवल्या जात नसल्याच्या बाबीकडे सदस्य हरी खोबरेकर यांनी लक्ष वेधले. जिल्हय़ात तयार करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वॉरंटाईन केंद्रांमध्ये केवळ आरोग्य सुविधा पुरवण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची आहे. यामध्ये दाखल असलेल्या रुग्णांना जेवण पुरवणे, स्वच्छता राखणे, इतर साहित्य पुरवणे ही जबाबदारी महसूल विभागाची आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणचे नागरिक ग्रामीण भागात दाखल होत आहेत. अशा व्यक्तींची तक्रार आरोग्य विभागाने पोलिसात करावी, अशी मागणी खोबरेकर यांनी केली. यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी, जिल्ह्य़ाची आरोग्य यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी गुंतलेली आहे. त्यांना पोलीस तक्रारीसारख्या विषयात गुंतवता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावागावात स्थापित झालेल्या कृती समितीमधील तलाठी, ग्राम सेवक, पोलीस पाटील यांनी याबाबत तक्रार करावी, असे सुचवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.