सिंधुदुर्ग - गोव्यातून मुंबईच्या दिशेने होणार्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकीविरोधात अबकारी खात्याने कारवाई केली. या कारवाईत ३ लाख २० हजार रुपयांच्या दारुसह १ लाख ८० हजारांचा टेम्पो असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी गिरीश जोशी ( वय ४५, रा. ठाणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पत्रादेवी चेकपोस्टवर करण्यात आली.
गोव्यातून मुंबईच्या दिशेने होत होती वाहतूक
गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा टेम्पो (एमएच ०४ एफपी २४५४) पत्रादेवी चेकपोस्टवर तपासणीसाठी थांबविण्यात आला आणि त्या टेम्पोचे सील तोडून तपासणी करण्यात आली. यावेळी टेम्पोत मोठ्या प्रमाणात दारुसाठा आढळून आला.
बियर व व्हिस्कीसह सुमारे ३ लाख २० हजार रुपयांची दारू
टेम्पोत बियर व व्हिस्कीसह सुमारे ३ लाख २० हजार रुपयांच्या दारुचे बॉक्स आढळून आले. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा टेम्पो असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दामोदर लोलीनकर, गार्ड दिगंबर कुंकळकर, बिंदेश पेडणेकर, अर्जुन गवस, असिस फर्नांडिस व विश्वास केणी यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - सिंधुदुर्गच्या समुद्रात फडकला ३२१ फूट तिरंगा ध्वज
हेही वाचा - सिंधुदुर्गात कोल्हापुरातील एकावर चाकूहल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल