ETV Bharat / state

Death by landslide: गुरे चारायला गेलेल्या तरूणाचा अंगावर दरड कोसळून मृत्यू; कांदाटी खोऱ्यातील घटना - दरड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू

Death by landslide: महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम कांदाटी खोऱ्यात गुरे चारायला गेलेल्या १८ वर्षाच्या तरूणाचा अंगावर दरड कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगेश धोंडीबा ढेबे, असे तरूणाचे नाव आहे.

Death by landslide
Death by landslide
author img

By

Published : Oct 21, 2022, 10:45 PM IST

सातारा: महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम कांदाटी खोऱ्यात गुरे चारायला गेलेल्या १८ वर्षाच्या तरूणाचा अंगावर दरड कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगेश धोंडीबा ढेबे, असे मृत तरूणाचे नाव असून या घटनेमुळे ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. कांदाटी खोऱ्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आहे.

दरड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू गेल्या 10 दिवसांपासून कांदाटी खोऱ्यात विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे या परिसरात सातत्याने दरडी कोसळत आहेत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असताना गुरे चारायला गेलेल्या मंगेश ढेबे या तरूणाच्या अंगावर अचानक दरड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्युमुळे पर्वत या गावावर शोककळा पसरली आहे.

तुफान पाऊस सुरु तुफान पावसामुळे ही दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. संध्याकाळच्या सुमारास तुफान पाऊस सुरु होता. दरड कोसळण्याची घटना कळताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली.पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण येत होता, अशी माहिती इथल्या स्थानिकांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.